शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सलाम ! शहीद संतोष महाडिक यांची पत्नी स्वाती महाडिक सैन्यात रुजू, अंत्यविधीवेळी घेतलेली शपथ केली पुर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 13:42 IST

शहीद संतोष महाडिक यांच्या अंत्यविधीवेळीच स्वाती महाडिक यांनी भारतीय सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचा निर्धार केला होता. त्यांनी आपली ही शपथ पुर्ण केली असून सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत. 

ठळक मुद्देशहीद संतोष महाडिक यांच्या अंत्यविधीवेळीच स्वाती महाडिक यांनी भारतीय सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचा निर्धार केला होतास्वाती महाडिक आपली ही शपथ पुर्ण केली असून सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेतअकरा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे येथील देहूरोड येथे होणार आहे17 नोव्हेंबर 2015 रोजी कुपवाडा येथे 41 राष्ट्रीय राईफल्स बटालियनचे नेतृत्व करताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते

चेन्नई, दि. 9 - जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये शहीद झालेले पोगरवाडी (ता. सातारा) येथील कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक भारतीय सैन्यात रुजू झाल्या आहेत. शहीद संतोष महाडिक यांच्या अंत्यविधीवेळीच त्यांनी भारतीय सैन्यात जाऊन देशसेवा करण्याचा निर्धार केला होता. त्यांनी आपली ही शपथ पुर्ण केली असून सैन्यात लेफ्टनंट म्हणून रुजू झाल्या आहेत. 

वर्षभराच्या खडतर प्रशिक्षणानंतर स्वाती महाडिक देशसेवेसाठी सज्ज झाल्या आहेत. चेन्नईतल्या ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमीतील कार्यक्रमात स्वाती महाडिक यांनी लेफ्टनंटपदाची शपथ घेतली. या सोहळ्यासाठी महाडिक कुटुंबीयांसह स्वाती यांच्या माहेरची मंडळीही चेन्नईत उपस्थित होती. गेल्या अकरा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे येथील देहूरोड येथे होणार आहे. 

17 नोव्हेंबर 2015 रोजी कुपवाडा येथे 41 राष्ट्रीय राईफल्स बटालियनचे नेतृत्व करताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर ‘शौर्यचक्र’ पुरस्कारही दिला गेला.

शहीद कर्नल संतोष यांच्या अंत्यसंस्कार विधीदरम्यान स्वाती महाडिक यांनी आपण देशसेवेत रुजू होणार असल्याचे जाहीर केले होते. तसेच आपल्या मुलांनाही सैन्यातच भरती करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार, त्या आता सैन्यदलात रूजू झाल्या आहेत.

स्वाती यांनी पुणे विद्यापीठातून पदवीपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यांना मिलिट्रीमध्ये दाखल होण्यासाठी तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर आणि लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह यांनी वयाची अट शिथील केली होती.

प्रशिक्षणात अव्वल...-‘सैन्यात भरती होणं,’ या एकाच उद्देशाने झपाटून गेलेल्या स्वाती महाडिक या प्रशिक्षणार्थींमध्येही अव्वल राहिल्या. चेन्नई येथे शुक्रवारी प्रशिक्षण तळावर झालेल्या कौतुक सोहळ्यात ‘बेस्ट कॅडेट’ म्हणून मिळालेलं पदक कुटुंबीयांना दाखविताना त्यांच्या भावना अनावर झाल्या होत्या.

चेन्नईत खडतर प्रशिक्षणदेशसेवेसाठी संधी मिळण्यासाठी स्वाती महाडिक यांनी जोरदार प्रयत्न केले होते. त्यांच्या निर्धाराला हिरवा कंदील मिळाल्यानंतर त्यांनी चेन्नईत एक वर्ष अथक प्रयत्न केले. चेन्नईत मिलिट्री ट्रेनिंग सेंटरमध्ये स्वाती यांच्यासोबतचे सर्व उमेदवार हे किमान 10 वर्षांनी लहान होते. त्यामुळे स्वाती यांना त्यांच्याप्रमाणे प्रशिक्षण घ्यावं लागलं. 

टॅग्स :Indian Armyभारतीय जवान