शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
2
"मी मरायला तयार आहे, अनोळखी लोकांनी दिलेल्या अन्नावर जगतोय"; युवीच्या वडिलांना भावना अनावर
3
Bihar CM: नितीश कुमारच होणार बिहारचे मुख्यमंत्री! भाजप प्रदेशाध्यक्षांनीच गोंधळ थांबवला; म्हणाले, "फक्त..."
4
काय सांगता! वय ९१ वर्षे, रोज १२ तास काम करतात, फिटनेसचे रहस्य वाचून अवाक् व्हाल
5
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
6
ओवेसींच्या पाठिंब्याने आमदार बनले काँग्रेसचे नवीन यादव; विजयानंतर पाया पडून मानले आभार
7
UPI ट्रान्झॅक्शन फेल झालं? घाबरू नका, त्वरित फॉलो करा 'या' स्टेप्स
8
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या नरभक्षक बिबट्याला घातल्या गोळ्या!
9
"भारत कुठल्याही युद्धासाठी तयार...!", जनरल द्विवेदी यांचा पाकिस्तानला थेट इशारा; चीनसंदर्भातही बोलले
10
नासिरशी निकाहाचा व्हिडीओ व्हायरल होताच पुन्हा गायब झाली सरबजीत कौर; वकिलाने केलं मोठं वक्तव्य! म्हणाला-
11
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
12
Pune Train Accident: पुण्यात भीषण अपघात! दौंडला जाणाऱ्या ट्रेनने उडवले; हडपसरमधील तीन तरुण जागीच ठार
13
"डॉक्टर RDX बांधून स्वतःला उडवून देत आहेत"; मुफ्तींचा केंद्रावर हल्ला,'तुमच्या धोरणांनी दिल्लीही असुरक्षित'
14
Ganpatipule: गणपतीपुळे येथे देवदर्शनाला गेलेले भिवंडीतील ३ जण समुद्रात बुडाले; एकाचा मृत्यू!
15
इस्त्रीत लपवले कोट्यवधी रुपयांचे सोने; हैदराबाद विमानतळावरील घटना, दोघे अटकेत
16
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
17
गळ्यात नेकलेस घातला अन् पैठणीची लुंगी नेसला! 'ठरलं तर मग' फेम अभिनेत्याचा लूक पाहून चाहत्यांनी डोक्यावर मारला हात
18
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
19
Leopards Alert: बिबट्यापासून सतर्क करेल एआय कॅमेरा; दिसताच वाजेल सायरन!
20
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
Daily Top 2Weekly Top 5

शिवस्मारकाच्या उंचीवरून खडाजंगी, विरोधकांचा सभात्याग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2018 06:25 IST

अरबी समुद्रात उभारण्यात येणार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची कमी करण्यात येणार असल्याच्या मुद्द्यावरून आज विरोधक आणि सत्ताधाºयांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. छत्रपतींच्या पुतळ्याची उंची २१० मीटर इतकीच असेल,

विशेष प्रतिनिधीमुंबई : अरबी समुद्रात उभारण्यात येणार असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाची उंची कमी करण्यात येणार असल्याच्या मुद्द्यावरून आज विरोधक आणि सत्ताधाºयांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. छत्रपतींच्या पुतळ्याची उंची २१० मीटर इतकीच असेल, अशी ग्वाही वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. तर हे जगातील सर्वात उंच स्मारक असेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.विधानसभेत प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर राष्ट्रवादी काँगे्रसचे गटनेते जयंत पाटील यांनी स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून शिवस्मारकाच्या उंचीचा मुद्दा उचलून धरला. या स्मारकाच्या निविदा राज्य सरकारने दिली आहे. यामध्ये महाराजांच्या पुतळ्याची उंची १६० मीटर वरून १२६ मीटर करण्यात आल्याचे समजते. महाराजांच्या विचारांची प्रतारणा करण्यासारखे आहे. पहिल्या प्रस्तावाला पर्यावरण खात्याने मंजुरी दिली असताना, पुन्हा प्रस्ताव बदलण्याची गरज का भासली, असा सवाल पाटील यांनी केला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार या ज्येष्ठ सदस्यांनी या विषयावर चर्चेची मागणी केली. दुसरीकडे भाजपाचे सदस्य आक्रमक होत पुढे आले.शिवरायांच्या स्मारकाचा निर्णय २००१ मध्ये झाला होता, पण त्यास अंतिम मंजुरी मिळण्यासाठी २०१७ उजाडावे लागले. १५ वर्षांत तुम्ही काहीही केले नाही. चर्चाच करायची असेल, तर मग तुमच्या काळात शिवरायांवरील चित्रपट का निघाला नाही, रायगड, शिवनेरीसाठी तुम्ही काय केले, याचीही चर्चा करावी लागेल. हिंमत असेल तर चर्चा करा, असे आव्हान वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी देताच विरोधक अधिक आक्रमक होऊन घोषणा देऊ लागले. छत्रपतींच्या पुतळ्याची उंची २१० मीटर राहणार असून विरोधकांनी स्मारकावरून राजकारण करू नये, असे मुनगंटीवार म्हणाले. तरीही गदारोळ सुरूच राहिल्याने अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब केले.कामकाज पुन्हा सुरू झाले, तेव्हा शिक्षणमंत्री विनोद तावडे व विरोधक यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. छत्रपतींचे नाव घेऊन सत्तेत आला अन् महाराजांच्या पुतळ्याची उंची कमी करता, याबद्दल महाराष्ट्राची जनता तुम्हाला माफ करणार नाही, असे जयंत पाटील म्हणाले. छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी करण्याचा निर्णय हा गंभीर विषय आहे. सरकारने असंवेदनशील दाखवत जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, असा संताप विखे पाटील यांनी व्यक्त केला. स्मारकाच्या रचनेत बदल केला जात असल्याने पर्यावरण विभागाची नव्याने परवानगी घ्यावी लागणार असल्याने, स्मारकाचे काम रखडले असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला.पंतप्रधानांनी शिवस्मारकाचे भूमिपूजन केल्यानंतरही स्मारकाचे काम सुरू झालेले नाही. त्याची उंची कमी करण्याचा प्रयत्न केला, तर जनता सरकारला माफ करणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला. आमच्या सरकारने स्मारकाचे काम पुढे नेले. तुम्ही काहीच केले नाही. त्यामुळे तुमच्या पोटात दुखते आहे. या विषयावर तरी राजकारण करू नका, असा टोला तावडे यांनी विरोधकांना हाणला.रचना व उंची गुणोत्तर प्रमाणातविरोधकांच्या आरोपाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चोख उत्तर दिले. विरोधकांची सत्ता असताना महाराजांच्या प्रकल्पाची चर्चा सुरु झाली. केंद्रातही यांचीच सत्ता होती. मात्र, यांना स्मारकाची एकही वीट रचता आली नाही. हे सरकार जगातले सर्वात उंच स्मारक उभारणार आहे. या स्मारकाची रचना व त्याची उंची ही गुणोत्तर प्रमाणात ठरविण्यात आल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :MumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्र