शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

सिल्लोड तालुक्यात भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: May 16, 2017 16:05 IST

सिल्लोड तालुक्यात 88 गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

श्यामकुमार पुरे सिल्लोड, दि. 16 - सिल्लोड तालुक्यात 88 गावांत भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. 12 गावांत मागणी असूनही प्रशासनाच्या दिरंगाईमुळे टँकर सुरू झाले नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. प्रशासनाने 49 गावांत 65 टँकर सुरू केले आहे. 27 गावांत 43 विहिरीचे अधिग्रहण केले आहे. नागरिकांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. बहुतेक गावांतील सार्वजानिक व शेतातील विहिरींनी तळ गाठला आहे. तालुक्यातील धरणांची पाणीपातळी कमी झाली आहे. आवश्यक तेथे तात्काळ टँकर सुरू करावे, अशी मागणी नागरिक करीत आहे.यावर्षी विविध मध्यम प्रकल्प व विहिरीतून शेतीसाठी पाणी उपसा झाल्याने बहुतेक धरणाची पाणीपातळी कमालीची घटली आहे. सिल्लोड तालुक्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याचे चिन्ह दिसत असताना प्रशासनाने 65 टँकर सुरू केले आहेत. अनेक गावांत भुजल सर्वेक्षण अधिकारी यांच्या प्रमाणपत्राअभावी अजूनही टँकरचे प्रस्ताव धूळ खात पडून आहे.खेळणा मध्यम प्रकल्प ब्लू सील...सिल्लोड तालुक्यातील धरण व पाणी पातळी अशी:- सिल्लोड येथील खेळणा मध्यम प्रकल्प ब्लू सील आहे. अजिंठा अंधारी मध्यम प्रकल्पात केवळ 4.67 टक्के पाणी आहे. केळगाव 4 टक्के, उंडणगाव, रहिमाबाद प्रकल्पात मृतसाठा आहे. सिल्लोड तालुक्यातील या धरणातून अनेक गावात पाणीपुरवठा करण्यात येतो. अजूनही काही धरणातून शेतीसाठी पाणी उपसा सुरू आहे. कापूस व मिर्ची लागवडीसाठी मध्यम प्रकल्पांतून होणारा पाणी उपसा थांबविला गेला नाही तर गंभीर प्रश्न निर्माण होईल.49 गावांत 65 टँकर सुरू असलेली गावे अशी:- सिल्लोड तालुक्यातील पळशी, म्हसलाखुर्द, उपळी, लोनवाडी, खातखेडा, धानोरा, दीडगाव, पिम्प्री, वरूड, अनाड, गव्हाली, बोजगाव, रहिमाबाद, तलवाड़ा, पिरोळा, डोईफोडा, टाकलीखुर्द, आसडी, पिंपळगाव घाट, शेखपूर, पालोदवाडी, धावड़ा, डखला, सराटी, बबोदवड, जंजाला, अंधारी, मुखपाठ, पांगरी, बोरगाव सारवनी, सावखेडा, पिंपलदरी वाडा, बालापुर, कायगाव वाडी, पिम्पलगाव पेठ, म्हसला बुद्रुक, निल्लोड वाडी, पिम्पलदरी, वडोदचाथा, पानवडोद, धोत्रा, वडालीटाका, नाटवी, चिंचवन, सिरसाळातांडा, को-हाळातांडा, रेलगाववाडी, कोटनान्द्रा, परदेशीवाडी या 49 गावांत 65 टँकर सुरू आहेत.12 गावांचे प्रस्ताव धूळ खात पडून तालुक्यातील 12 गाव जलकीघाट, जुनापानेवाड़ी, तांडाबाजार, टाकलीजीवरग, उंडंणगाववाडी, घटाम्ब्री, पानस, चिंचखेडा, डोंगरगांव, हट्टी, सोनप्पावाडीचे प्रस्ताव भूजलच्या प्रमाणपत्रासाठी अडकून पडले आहेत. तर वांगी बुद्रुक, प्रस्ताव उपविभागीय अधिकारी कार्यालयात मंजुरी अभावी पडून आहे. जनता पाण्यासाठी वन वन भटकंती करीत आहे. तर प्रशासन कागदी घोड़े नाचवून नागरिकांची थट्टा करताना दिसत आहे. वरील गावात तात्काळ टँकर सुरू करावे, अशी मागणी होत आहे.