शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

अर्धा महाराष्ट्र दुष्काळाच्या छायेत, २०० तालुक्यांत भीषण पाणीटंचाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2018 06:09 IST

राज्यात सरासरीच्या केवळ ७८ टक्के पाऊस पडला असून २०० हून अधिक तालुक्यांत पाणीटंचाईची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीडसह इतर १३ जिल्ह्यांत तर केवळ ५० ते ७५ टक्के पाऊस झाल्याने भीषण दुकाळाचे सावट आहे.

पुणे : राज्यात सरासरीच्या केवळ ७८ टक्के पाऊस पडला असून २०० हून अधिक तालुक्यांत पाणीटंचाईची गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, बीडसह इतर १३ जिल्ह्यांत तर केवळ ५० ते ७५ टक्के पाऊस झाल्याने भीषण दुकाळाचे सावट आहे.राज्याच्या कृषी विभागाने पीकपाण्यासंदर्भात तयार केलेल्या अहवालात टंचाईसदृश परिस्थितीचे अनुमान काढले आहे. यंदा ३५५ तालुक्यांपैकी २८ तालुक्यांत २५ ते ५० टक्के, १४३ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के तर १२१ तालुक्यांत ७५ ते १०० पाऊस पडला आहे. केवळ ६३ तालुक्यांत १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचे अहवालात म्हटले आहे. राज्यात सरासरीच्या ७६.८ टक्के पाऊस झाला आहे. औरंगाबाद विभागात एकूण २८ तालुक्यांपैकी ५ तालुक्यांत २५ ते ५० टक्के तर २१ तालुक्यांत ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली असून केवळ १२ तालुक्यात १०० टक्के पाऊस झाला आहे. विभागात पावसातील खंडामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे कापूस पिकावर रस शोषणाऱ्या किडीचा व शेंदरी बोंडअळीचा अल्प प्रमाणात प्रादूर्भाव आढळून आला आहे. लातूर विभागात ४८ तालुक्यांपैकी ३ तालुक्यात २५ ते ५० टक्के २६ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला असून केवळ ६ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे.नागपुरात किडीचा प्रादुर्भावनागपूर विभागातील ६४ तालुक्यांपैकी २२ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला असून केवळ १२ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. विभागात कापूस पिकावर रस शोषणाºया किडीचा व शेंदरी बोंडअळीचा, भात पिकावर काही ठिकाणी पिवळा खोडकिडा आणि करपा रोगाचा प्रादूर्भाव आढळून आला आहे.विभागनिहाय तालुक्यातील पावसाची स्थितीविभाग तालुके २५ ते ५० ५० ते ७५ ७५ ते १०० १०० पेक्षा जास्तकोकण ४७ -- ०३ २५ १९ तालुकेनाशिक ४० ०५ २२ ११ ०२पुणे ३९ १३ १६ ०४ ०६कोल्हापूर ३३ ०१ ०९ १२ ११औरंगाबाद २८ ०५ २१ ०२ --लातूर ४८ ०३ २६ १३ ०६अमरावती ५६ ०१ २४ २४ ०७नागपूर ६४ -- २२ ३० १२प्रत्येक वेळी केंद्रावर अवलंबून राहावे लागतेवेळेवर पाऊस न झाल्यामुळे खरीप पिकांचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने ‘दुष्काळ’ शब्द काढून टाकला आहे. त्यामुळे प्रत्येक वेळी केंद्र शासनावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या कार्यकक्षेत दुष्काळ शब्दाचा अंतर्भाव करण्यासाठी परिपत्रक काढावे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. जनावरांना चारा-पाण्याची सोय करावी. दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे.- बुधाजीराव मुळीक, ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रWaterपाणी