शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

मुंबईत जोरदार पाऊस, लोकल सेवेवर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 08:25 IST

मुंबईमध्ये मंगळवारीदेखील जोरदार पाऊस पडत आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 17 - मुंबईमध्ये मंगळवारीदेखील जोरदार पाऊस पडत आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या पावसामुळे लोकल सेवेवर परिणाम झाला आहे.  मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे मार्गावरील गाड्या 10 मिनिटे उशिराने धावत आहेत. तर पश्चिम रेल्वेवरील लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस दीड ते 2 तास उशिराने आहेत. यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहेत. जोरदार पावसाने मुंबईच्या काही भागांमध्ये पाणी साचले आहे. चेंबूर, खार, अंधेरीसह मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले आहे. 
 
पावसाचा वेग कायम राहणार असून, येत्या ४८ तासांसाठी मुंबई शहर आणि उपनगरात पावसाच्या जोरदार सरी कोसळतील, असा अंदाज कुलाबा वेधशाळेने वर्तवला आहे.दरम्यान,  सोमवारी ( 18 जुलै )गेल्या तीन वर्षांतील विक्रमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.
   
सोमवारी रौद्ररूप धारण केलेल्या पावसानं मुंबई शहर-उपनगरासह ठाणे, नवी मुंबई, रायगडला सकाळपासून रात्रीपर्यंत जोरदार झोडपून काढले. मुंबईत प्रामुख्याने कुलाबा, घाटकोपर आणि गोरेगाव येथे मुसळधार पाऊस पडला. मुसळधार पावसाने दिवसभर आपला मारा कायम ठेवला होता. त्यामुळे पूर्व व पश्चिम द्रुतगती महामार्ग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड आणि लालबहादूर शास्त्री मार्गावर पावसाचे पाणी साचल्याने ठिकठिकाणी वाहतूककोंडी झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.
(जोरदार पावसाचे राज्यात ५ बळी)
सोमवारी सकाळपासूनच पावसाने मुंबईवर सरींचा वर्षाव सुरू केला. कुलाबा, घाटकोपर आणि गोरगाव परिसरात सकाळच्या पावसाने दमदार हजेरी लावली. सकाळनंतर दुपारी काही काळ पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर मात्र सायंकाळी पुन्हा रौद्ररूप धारण केलेल्या जलधारांनी भांडुप, मुलुंड, घाटकोपर, कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, लालबाग, भायखळा, फोर्टसह कुलाबा, मरिन ड्राइव्ह, महालक्ष्मी, वरळी, लोअर परळ, माहीम, वांद्रे-कुर्ला संकुल, सांताक्रूझ, विलेपार्ले, अंधेरी, बोरीवली आणि गोरेगावला झोडपून काढले.
 
पावसामुळे शहरात तीन, पश्चिम उपनगरांत दोन अशा एकूण पाच ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. शहरात नऊ, पूर्व उपनगरात दोन आणि पश्चिम उपनगरात सात अशी एकूण अठरा ठिकाणी झाडे कोसळली. सुदैवाने या दुर्घटनांत मनुष्यहानी झालेली नाही.
 
हवामानाचा अंदाज
१८ जुलै : कोकण, गोवा, मराठवाडा, विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस
 
१९-२० जुलै : संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता
 
२१ जुलै : कोकण, गोवा, विदर्भ, मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसाची शक्यता
मान्सून अपडेट
मान्सून सोमवारी पश्चिम राजस्थानच्या आणखी काही भागात, पूर्व राजस्थानच्या उर्वरित भागात, हरियाणाच्या आणखी काही भागात दाखल झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान शास्त्र विभागाने दिली.