शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

पावसाची जोरदार हजेरी कायम

By admin | Updated: July 31, 2016 04:58 IST

गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने शुक्रवारनंतर शनिवारीही सकाळपर्यंत आपला मारा कायम ठेवला.

मुंबई : गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या जोरदार पावसाने शुक्रवारनंतर शनिवारीही सकाळपर्यंत आपला मारा कायम ठेवला. शनिवार दुपारनंतर सायंकाळपर्यंत पावसाने काहीशी विश्रांती घेतली असली तरी तुरळक ठिकाणी झालेल्या पावसाच्या माऱ्यामुळे शहरासह उपनगरातील जनजीवन थोडे विस्कळीत झाले होते. दरम्यान, पावसाचा जोर सुरूच राहिल्याने ठिकठिकाणी होणाऱ्या पडझडींच्या घटनांमध्ये वाढच झाली.शुक्रवारी रात्री अधूनमधून बरसणाऱ्या पावसाने शनिवारी सकाळी शहरासह उपनगरात तुफान हजेरी लावली. शहरापेक्षा उपनगरात पावसाचे प्रमाण अधिक होते. शहरात कुलाबा, फोर्ट, भायखळा, लालबाग, वरळी, लोअर परळ, दादर, माहीम आणि सायन येथे सकाळी पावसाने जोरदार मारा केला. पूर्व उपनगरात कुर्ला, विद्याविहार, घाटकोपर, विक्रोळी, कांजूर आणि मुलुंडमध्येही जोरदार पावसाच्या सरी बरसल्या. पश्चिम उपनगरात वांद्रे-कुर्ला संकुल, विलेपार्ले, अंधेरी, साकीनाका, पवई, बोरीवली आणि गोरेगाव येथेही जोरदार पावसाच्या सरी बरसल्या.पावसाच्या जोरदार सरी कोसळत असतानाच पडझडीच्या घटनाही घडतच होत्या. मरिन लाइन्स येथील आयकर भवनाच्या शेजारी असलेल्या बेल हेवन इमारतीसमोर झाड कोसळल्याची घटना घडली. या घटनेत खासगी सुरक्षारक्षक जफीर खान (४८) हे जखमी झाले. त्यांना जी.टी. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या पाठीला मार लागला असून, प्रकृती स्थिर आहे. सायनमधल्या भंडरवाड्यातील २९ व्या रस्त्यावर आय नावाच्या इमारतीमधील खोली क्रमांक २३ मधील सीलिंगच्या प्लास्टरचा भाग दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत ममता गुप्ता (२४) यांना मुका मार लागला. खासगी रुग्णालयात उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. १६ ठिकाणी पाणी साचलेपश्चिम उपनगरात ७ ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी महापालिका नियंत्रण कक्षाला प्राप्त झाल्या. या तक्रारींबाबत विभाग कार्यालयांना माहिती देण्यासह साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यात आला. शहरात ५, पूर्व उपनगरात ४ अशा एकूण ९ ठिकाणीही पाणी साचले. या पाण्याचाही विभाग कार्यालय स्तरावर निचरा करण्यात आला.>५ ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्याशहरात १, पूर्व उपनगरात २ आणि पश्चिम उपनगरात २ अशा एकूण ५ ठिकाणी घरांच्या भिंतींचा भाग कोसळल्याच्या घटना घडल्या. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.>३९ ठिकाणी शॉर्टसर्किटशहरात ११, पूर्व उपनगरात १० आणि पश्चिम उपनगरात १८ अशा एकूण ३९ ठिकाणी शॉर्टसर्किटच्या घटना घडल्या. यात कुणालाही मार लागला नाही.>ठिकठिकाणची पावसाची नोंद (मिमी)भायखळा ८३.७५, कुलाबा ७२.३५, दादर ३३.५, धारावी ७३.८८, वडाळा ९२.४, वरळी ९४.९६, अंधेरी ११७.८२, वांद्रे ११३.५१, बोरीवली ६४.४१, दहिसर ९५.२१, दिंडोशी १०८.७, गोरेगाव १०५.१४, मालाड ८७.९, मरोळ ११०.९४, विलेपार्ले १०४.१२>बुडालेल्या व्यक्तीचा शोध सुरूचनॅशनल पार्कमधील मगर तलावात एक व्यक्ती बुडल्याची घटना घडली. बचावकार्यासाठी अग्निशमन दलासह नौदलच्या पाणबुड्यांना घटनास्थळी धाडण्यात आले. मात्र, शनिवार सायंकाळपर्यंत बुडालेल्या व्यक्तीचा शोध लागला नाही. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते.