शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण महाराष्ट्रात पाऊस; सोलापूर बाजारपेठेत पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2020 04:26 IST

कोल्हापूर जिल्ह्यातही धुव्वाधार; सांगलीतही हजेरी

सोलापूर/कोल्हापूर/सांगली/सातारा : राज्यात सर्वदूर मान्सूनचे आगमन झाल्यानंतर मंगळवारी दक्षिण महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम आहे. सोलापुरला पावसाने शहरातील बाजारपेठा आणि भाजीमंडईत पाणी साचले होते. कोल्हापूर जिल्ह्यात धरणक्षेत्रात धुव्वाधार पाऊस झाला. सांगली जिल्ह्यात सर्वदूर पाऊस होता. सातारा जिल्ह्यात रिमझिम सुरू होती.सोलापूर शहर व जिल्ह्यात सकाळी आठ वाजेपासून पाऊस सुरू झाला. त्यामुळे बाजारपेठा, भाजीमंडई, रस्त्यांवर पाणीच पाणी साचल्याचे चित्र होते.कोल्हापूरला धरणक्षेत्रासह गगनबावडा, राधानगरी, शाहूवाडी तालुक्यांमध्ये धुव्वाधार पाऊस झाला. नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत असून, पंचगंगा नदीच्या पातळीत दिवसभरात तीन फुटांनी वाढ झाली. सांगली जिल्ह्यात शिराळ्यापासून जतपर्यंत सर्वच तालुक्यांमध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात रिमझिम सुरू होती.कोकणात संततधाररत्नागिरी/सिंधुदुर्ग : कोकणात संततधार सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी दुपारपासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यात मंगळवारी कुडाळ तालुक्यातील ब्रिटीशकालीन माणगाव-आंबेरी पूल पाण्याखाली गेला होता. निर्मला नदीला आलेल्या पुरामुळे माणगाव परिसरातील तब्बल २७ गावांचा संपर्क तुटला आहे.नदी, नाले, ओहोळ दुथडी भरून वाहत आहेत. २४ तासांत सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक १२५ मि.मी. पाऊस झाला.कोकणात अतिवृष्टीचा इशाराबुधवारी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होईल. मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल. १८ जून रोजी कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.मराठवाड्यात मंगळवार कोरडाहिंगोली/बीड/परभणी/नांदेड/ उस्मानाबाद : मराठवाड्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत मंगळवार तसा कोरडा गेला. सोमवारी रात्री हिंगोली, बीड, परभणी, नांदेड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत काही ठिकाणी पाऊस झाला.नांदेड जिल्ह्यात मागील दोन दिवसांत झालेल्या पावसामुळे खरीप पेरण्यांना वेग आला आहे़