शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Rain Update : राज्यात मुसळधार पाऊस, खडकवासला धरण भरले,कोल्हापूर, सांगलीला पुराचा धोका; अनेक ठिकाणी सतर्कतेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2024 08:31 IST

Rain Update : गेल्या काही दिवसापासून राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

Rain Update : गेल्या काही दिवसापासून राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू आहे.  सांगल, कोल्हापूर जिल्ह्यात पूरस्थिती आहे. यामुळे नदीच्या बाजूला असणाऱ्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. राधानगरी धरणातील पाणी पातळीही वाढली आहे, त्यामुळे कोणत्याही क्षणी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडू शकतात. तर दुसरीकडे चांदोली धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.  पुण्यातही मुसळधार पाऊस सुरू असून भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर आणि पुणे शहरातील शाळा २५ जुलै रोजी बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Breaking: पुण्यात रात्रभर पाऊस कोसळतोय; आज संपूर्ण शहर, या भागातील शाळा बंद ठेवण्याचे आदेश

हवामान विभागानुसार, २५-२६ जुलै दरम्यान गुजरात राज्य, कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र, ओडिशा, कर्नाटक, पश्चिम मध्य प्रदेश, छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि केरळ आणि माहे येथे मुसळधार पावसाचा अंदाज आहे. या राज्यांच्या काही भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. तर IMD ने काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.

अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट

हवामान विभागाने सिंधुदुर्ग, कोल्हापूर (घाट भागात), रायगड, पुणे (घाट भागात) पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. मुंबईसह उपनगरातही मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तर, मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार आणि विदर्भात ऑरेंज अलर्ट आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचण्याची समस्या निर्माण झाली आहे. 

सांगलीच्या पूरपट्ट्यातील नागरिकांचे स्थलांतर सुरु

आयर्विन पुलाजवळील पाणीपातळी ३० फुटांवर गेल्यानंतर सांगलीच्या सूर्यवंशी प्लाॅटमध्ये पुराचे पाणी दाखल झाले. याठिकाणच्या १० कुटुंबांचे बुधवारी स्थलांतर करण्यात आले. पाणीपातळीत वाढ झाली तर परिसरातील आणखी काही कुटुंबांचे स्थलांतर करावे लागणार असल्याचे महापालिका प्रशासनाने सांगितले.

सांगलीच्या सूर्यवंशी प्लॉटमध्ये मध्यरात्री पाणी दाखल झाले. येथील आठ घरांना पाण्याने वेढले. त्यामुळे महापालिकेच्या सुचनेनुसार काही कुटुंबांनी नातेवाईकांकडे तर काहींनी महापालिकेच्या पुनर्वसन केंद्रात स्थलांतर केले. कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कायम राहिल्यास कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

कोयना धरणातील पाणीसाठा ७० टीएमसीच्या उंबरठ्यावर

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाने राैद्ररूप धारण केले असून साताऱ्यातही संततधार सुरू आहे. यामुळे पश्चिमेकडील घाटमार्गात दरडी कोसळू लागल्यात. नागरिकांनाही सुरक्षितस्थळी हलविण्यात येऊ लागलं आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. तर २४ तासांत सर्वाधिक पाऊस कोयना येथे १६२ तर नवजाला १५७ मिलीमीटर झाला आहे. कोयनेतील साठाही ७० टीएमसीच्या उंबरठ्यावर पोहोचलाय.

टॅग्स :Rainपाऊसmonsoonमोसमी पाऊस