शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

बेळगावात मुसळधार पाऊस, १५ पूल पाण्याखाली; अनेक गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2023 13:05 IST

आलमट्टी धरणाची आवक ८,३९४५ असून ६४,२०१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

-प्रकाश बेळगोजी 

बेळगाव - गेल्या सहा दिवसांपासून महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात सतत मुसळधार पाऊस पडत आहे. याशिवाय बेळगाव जिल्ह्यातही पावसाचा जोर वाढला असून, जिल्ह्यातील सात नद्यांतून पाण्याची आवक वाढली आहे, ही आनंदाची बाब आहे. घटप्रभा नदीतून 25765 क्युसेक, मार्कंडेय नदीतून 1454 क्युसेक, हिप्परगी बॅरेजमधून 91200 क्युसेकची आवक व तेवढ्याच प्रमाणात पाणी वाहत आहे.

आलमट्टी धरणाची आवक ८,३९४५ असून ६४,२०१ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यात एकूण १५ पूल पाण्याखाली गेले असून या पुलांपासून अनेक गावांचा संपर्क तुटला असून वाहतूक पर्यायी मार्गाने जोडण्यात आली आहे.भोजवडी कन्नूर, धुडगंगा नदीवर बांधलेला कारदगा भोज पूल, दूध गंगा नदीवर बांधलेला जत्राट भिवशी पूल, वेदगंगा नदीवर बांधलेला कन्नूर बरवडा अकोला-सिडना पूल, वेदगंगा नदीवर बांधलेला हुन्नरगी-ममदापूर पूल, चिकोडी तालुक्यातील मलिकवाड दत्तवाड पुल वेदगंगा नदीवर बांधलेला पूल.

हिरण्यकेशी नदीवरील उराणी कोचरी जोडणारा पूल, कृष्णा नदीवरील मांजरी भवनसौंदत्ती पूल, हालात्री धरण ओलांडून खानापुरा हेमडगा पूल, कृष्णा नदीवरील मंगळवती राजापूर पूल, वेदगंगा नदीवरील भोजवडी निप्पाणी पूल आणि घटप्रभा नदी, शेट्टीहल्ली मरनहोळ मार्गावरील एकूण 15 पूल पाण्याखाली गेले असून 15 पुलावरून जाणारी रहदारी पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे .जिल्हा पोलीस अधीक्षक संजीव पाटील यांनी नदीच्या पात्रात न जाण्याचा इशारा दिला असून, सर्व बुडीत पुलांवर बॅरिकेड्स लावण्यात आले असून हे पूल ओलांडू नयेत यासाठी योग्य पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

टॅग्स :belgaonबेळगावfloodपूरRainपाऊस