शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

आज काेकणात येणार उष्णतेची लाट; मुंबईतील कमाल तापमान ३८ अंशांवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2021 02:36 IST

हवामान खात्याचा इशारा

मुंबई : मार्च महिना संपत आहे तसा कमाल तापमानाचा पारा चढत आहे. बुधवारी कमाल तापमानाने कहर केला असून, मुंबईचे कमाल तापमान थेट ३८.१ अंश सेल्सिअस एवढे नोंदविण्यात आले. 

यंदाच्या मोसमातला आतापर्यंतचा हा उच्चांक असून, वाढत्या उन्हाने मुंबईकर घामाघूम हाेत आहेत. कमाल तापमानाचा तडाखा कायम राहणार असून, २५ मार्च रोजी कोकणात काही ठिकाणी उष्णतेची लाट येईल, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामानशास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत विदर्भ आणि लगतच्या भागावर असलेला चक्रवात आता मध्य प्रदेश आणि लगतच्या भागावर आहे.  मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाची नोंद झाली आहे. कोकण आणि मराठवाड्यात हवामान कोरडे होते. कोकणातील तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली असून, तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.  दरम्यान, बुधवारी सकाळी ११ वाजल्यापासूनच मुंबईकरांना उन्हाचे चटके जाणवू लागले. दुपारी ४ नंतरही उन्हाचा तडाखा कायम असल्याचे चित्र होते. याचा फटका नागरिकांना बसतो आहे. 

तापमानवाढीचे कारण काय?मार्च, एप्रिल आणि मे हे तीन महिने मान्सूनपूर्व म्हणून ओळखले जातात. मार्च महिना संक्रमणाचा महिना ओळखला जातो. आपण हिवाळ्यातून उन्हाळ्याकडे जात असतो. तापमानात मोठे बदल होत असतात. गरम आणि शुष्क वारे यांचा हा परिणाम असून उष्णता दबली गेल्याने तापमानात वाढ होते. नागरिकांनी काळजी घ्यायलाच हवी.  कोकणातल्या शहरांमध्ये तापमान वाढत असून, समुद्राहून जमिनीकडे वाहणारे वारे तापत असल्याने तापमान अधिक नोंदविण्यात येते. शिवाय आर्द्रता वाढल्याने उकाडा वाढतो, असे हवामान तज्ज्ञांनी सांगितले.