शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

महामुंबईतील तरुणाई हुक्क्याच्या गर्तेत

By admin | Updated: May 30, 2017 06:13 IST

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबई, पनवेलला अमली पदार्थांचा विळखा पडू लागला आहे. हॉटेलच्या

सूर्यकांत वाघमारे/ लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असलेल्या नवी मुंबई, पनवेलला अमली पदार्थांचा विळखा पडू लागला आहे. हॉटेलच्या आडून मोठ्या प्रमाणात हुक्का पार्लर चालविले जात आहेत. ‘लोकमत’ने वाशी, एपीएमसी, कोपरखैरणे परिसरात केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये मध्यरात्रीपर्यंत व काही ठिकाणी पहाटे चार वाजेपर्यंत हुक्का पार्लर सुरू असल्याचे निदर्शनास आले असून तरुणाई पूर्णपणे नशेच्या आहारी जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. प्राचीन काळात राजेशाही थाटाचा एक भाग असलेल्या हुक्क्याचे लोन राजस्थान, पंजाब तसेच हरियाणा येथून महाराष्ट्रापर्यंत पोचले आहे. मुळात १०० सिगारेटच्या धुरापेक्षाही अधिक घातक हुक्क्याचे ४० ते ४५ मिनिटाचे एक सत्र (सेशन) असतानाही केवळ फ्लेवरच्या मोहापोटी व लाइफस्टाइल म्हणून तरुणांकडून पसंती मिळताना दिसत आहे. हुक्का पार्लर चालवायचे असल्यास ४२ अटींचे पालन करणे सक्तीचे आहे. या अटींचे पालन करणे शक्य होत नसल्याने पोलीस, अन्न व औषध प्रशासनासह संबंधित सर्व शासकीय यंत्रणांना हाताशी धरून नवी मुंबई व पनवेल परिसरात बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर चालविले जात आहेत. काही ठिकाणी हुक्काच्या आडून अमली पदार्थ पुरविले जात आहेत. लोकमतने केलेल्या पाहणीमध्ये कोपरखैरणेमध्ये २, महापेमध्ये १, वाशीमध्ये ३, एपीएमसी परिसरात ४, सानपाडा, शिरवणे, कामोठे, नेरूळमध्ये प्रत्येकी १ व सीवूडमध्ये दोन ठिकाणी हुक्का पार्लर सुरू असल्याचे निदर्शनास आले. मॉल, जास्त वापरात नसलेल्या इमारती, हॉटेलचे टेरेस याशिवाय व्यावसायिक वापराच्या गाळ्यांचा त्यासाठी वापर होत आहे. सार्वजनिक ठिकाणी धूम्रपानाला बंदी असल्यामुळे ज्या हॉटेलमध्ये ३० पेक्षा जास्त खोल्या, अथवा ३० पेक्षा जास्त खुर्च्या असतील त्यांना ग्राहकांसाठी स्वतंत्र ‘स्मोकिंग झोन’ तयार करण्यास अनुमती आहे. त्याकरिता शासनाने नियम व अटी ठरवून दिल्या आहेत. याच स्मोकिंग झोनच्या नावाखाली स्वतंत्र जागेत हे हुक्का पार्लर आहेत. परंतु हॉटेलच्या परवाना प्रक्रियेतून वगळल्याने, त्याठिकाणी कारवाईचे देखील अधिकार नसल्याचे पोलिसांकडून भासवले जात आहे. काही हुक्का पार्लर चालकांचे हितसंबंध थेट मंत्रालय स्तरावर असल्यामुळे स्थानिक पोलिसांनाही त्यांच्यावर कारवाई करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या हुक्का पार्लरमागे मोठ्या प्रमाणात अर्थकारण दडलेले असल्यानेच या अवैध व्यवसायाला अभय मिळू लागले आहे. प्रत्येकाचे हात ओले होत असल्याने कारवाई करण्यास टाळाटाळ होत असल्याचेही बोलले जात आहे. एपीएमसी मॅफ्को मार्केटलगतच्या आवारात एका कंपनीच्या तिसऱ्या मजल्यावर हुक्का पार्लर सुरू आहे. विशेष म्हणजे त्याठिकाणी बिलाची रक्कम क्रेडिट अथवा डेबिट कार्डने भरल्यास ती हॉटेलच्या नावाऐवजी संबंधित कंपनीच्याच बँक खात्यात जमा होत आहे. बिनधास्तपणे सुरू असलेल्या या अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.नागरिकांच्या विरोधाकडे दुर्लक्ष कामोठे सेक्टर ३१ येथे सोसायटीचा विरोध असतानाही हुक्का पार्लर चालवले जात आहे. या हुक्का पार्लरवर कारवाई होऊ नये याकरिता संबंधितांनी अनेकांशी आर्थिक बांधणी केल्याची चर्चा आहे. त्यांच्याच नेरुळमधील ‘निर्वाणा’ हुक्का पार्लरवर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने तीन महिन्यांपूर्वी कारवाई केली होती. त्यावेळीदेखील आयुक्तालयाबाहेरील काही पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केल्याची चर्चा आहे. त्यानंतरही नवी मुंबई पोलिसांनी हुक्का चालकावर तसेच कामगारांवर गुन्हा दाखल करून सहा खटले भरले आहेत.पोलीस झटकताहेत जबाबदारी हॉटेलसाठी लागणाऱ्या परवानग्यांमधून वगळण्याच्या कारणावरून पोलिसांकडून हुक्का पार्लरवर कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. रात्री उशीरापर्यंत हुक्का पार्लच्या ठिकाणी तरुण तरुणी जमत असल्यामुळे नशेमध्ये जुने वाद उद्भवुन हानामारीच्या घटना घडण्याचीही शक्यता आहे.नियमांची पायमल्ली करून सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर ‘टोबॅको अ‍ॅक्ट‘ नुसार पोलिसांना देखील कारवाईचे अधिकार आहेत. शिवाय हुक्क्याच्या ठिकाणी अन्न अथवा पाणी देण्याला मनाई असतानाही, तशी सुविधा दिली जात आहे. यामुळे सर्रासपने हुक्का पार्लमध्ये नियमांची पायमल्ली करुन ग्राहकांच्या जिवाशी खेळ केला जात असल्याचे दिसत आहे.शहरात हुक्का पार्लरच्या संख्येत वाढ होत चालली आहे. त्यांच्याकडे योग्य परवाने आहेत की नाही, हे पालिकेसह अन्न व औषध प्रशासन तसेच पोलिसांकडून तपासले जाने गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र तसे होताना दिसत नसल्यामुळे संबंधीत सर्वच यंत्रनेच्या भूमिकेबाबत साशंकता व्यक्त होत आहे.‘लोकमत’च्या स्टिंग आॅपरेशनमध्ये निदर्शनास आलेल्या गोष्टी कोपरखैरणेमध्ये २, महापे, सानपाडा, शिरवणे, नेरूळमध्ये प्रत्येकी १, वाशी पामबीच रोडवर ३ व एपीएमसी परिसरामध्ये ४ ठिकाणी हुक्का पार्लर निदर्शनास आले.नियम धाब्यावर बसवून मध्यरात्री २ ते पहाटे ४ पर्यंत हुक्का पार्लर सुरूहुक्का पार्लरमध्ये युवक-युवतींचा सर्वाधिक समावेश एपीएमसी परिसरात मॅफ्कोजवळ कंपनीच्या जागेमध्ये हुक्का पार्लर सुरू हुक्का पार्लरचे बिल क्रेडिट कार्डद्वारे हॉटेलऐवजी कंपनीच्या नावावर होते जमाएपीएमसी पोलीस स्टेशन परिसरात हुक्का पार्लरहुक्का पार्लरमध्ये तरुणींची संख्याही जास्त असल्याचे आले निदर्शनासअपुऱ्या जागेतच बैठक व्यवस्थाहुक्क्याचा धूर बाहेर जाण्यासाठीची यंत्रणाच नसल्याने पूर्ण खोलीमध्ये धूर पसरल्याचे चित्रशहरातील हुक्का पार्लरमधील वास्तवाचे चित्रीकरण ‘लोकमत’ने केले आहे. रात्री दोन वाजेपर्यंत हुक्का पार्लर सुरू असल्याचे निदर्शनास आले.तरुणांमध्ये लाइफ स्टाईल म्हणून हुक्क्याचे केले जाते सेवन.