शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ भाेंग्यांबाबत १४ जूनला सुनावणी, उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 10:57 IST

नवी मुंबईतील मशिदींवरील भोंगे हटविण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी पाचलाग यांनी याचिकेद्वारे केली होती.

मुंबई : धार्मिक स्थळांवरील बेकायदेशीर ध्वनिक्षेपकांसंदर्भात जारी केलेल्या निर्देशांची अंमलबजावणी न केलेल्या २०१८ मध्ये दाखल अवमान याचिकेवरील सुनावणी १४ जून रोजी घेणार असल्याचे उच्च न्यायालयाने मंगळवारी स्पष्ट केले. याचिकाकर्ते संतोष पाचलाग यांनी २०१४ मध्ये उच्च न्यायालयात धाव घेतली. नवी मुंबईतील मशिदींवरील भोंगे हटविण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी पाचलाग यांनी याचिकेद्वारे केली होती.  २०१६ मध्ये न्या. अभय ओक (सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायाधीश) यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ध्वनी प्रदूषणासंदर्भात दाखल अनेक याचिकांवर निर्देश देताना स्पष्ट केले की, कोणताही धर्म किंवा संप्रदाय ध्वनिक्षेपक किंवा सार्वजनिक संबोधन प्रणाली घटनेचे अनुच्छेद २५ (विवेकबुद्धीचे स्वातंत्र्य व मुक्त व्यवसाय, धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र) द्वारे प्रदान केलेल्या मूलभूत अधिकारांचा भाग आहे, असा दावा करू शकत नाही. न्यायालयाने ध्वनी प्रदूषण (अधिनियम व नियंत्रण) नियम, २००० चे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश सरकारला दिले. संतोष पाचलाग यांनी मंगळवारी ही याचिका न्या. ए. ए. सय्यद व न्या. अभय आहुजा यांच्या खंडपीठासमोर सादर केली. न्यायालयाने तत्काळ सुनावणी घेण्यास नकार देत १४ जून रोजी सुनावणी ठेवली. 

प्रतिवादी प्राधिकरणे शिक्षेस पात्रध्वनी प्रदूषण कायद्याच्या उल्लंघनामुळे वृद्ध लोक, नवाजत बालके, पक्षी, प्राणी, आदींना त्रास होत आहे. प्रतिवादी प्राधिकरणे अवमान याचिका कायद्यातील तरतुदींनसार शिक्षेस पात्र आहेत, असे याचिकेत म्हटले आहे. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयCourtन्यायालय