शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
2
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग चालणार; २०७ खासदारांचा पाठिंबा
3
नालासोपारा हादरलं! प्रियकराच्या मदतीने पत्नीने केली पतीची हत्या; मृतदेह घरातच पुरला अन् वर...
4
भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी
5
एक सेकंदात दोन्ही स्विच बंद करणं अशक्य, त्यावेळी नेमकं काय घडलं? या ५ बाबींमधून उघड होणार, अमेरिकन रिपोर्टचं पितळ उघडं पडणार
6
केरळचे माजी मुख्यमंत्री, ज्येष्ठ माकप नेते व्ही.एस. अच्युतानंदन यांचं निधन, वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
Pune: बीडचा तरुण पुण्यात मित्रांसोबत फिरायला गेला, पोहायला धरणात उतरला अन्...
8
'आणखी किती पुरावे हवेत ते सांगा'; कोकाटेंचे आणखी व्हिडीओ समोर, आव्हाड म्हणाले, "व्यवस्थित बघा,कुठला पत्ता"
9
महाराष्ट्रानंतर आता बंगालमध्ये 'भाषा' पॉलिटिक्स? ममता बॅनर्जी यांनी उघड-उघड खेळलं 'बांगला कार्ड'!
10
'चायनीज' माल निघाला दगाबाज! बांगलादेशात कॉलेजवर कोसळलेले 'ते' लढाऊ विमान चिनी बनावटीचे
11
Deep Amavasya 2025: रिल्स करण्याच्या नादात चुकीचे पायंडे पाडू नका; दिव्यांची आवस 'अशी' करा!
12
IND vs ENG : 'ऑल इज वेल सीन'! विकेट किपिंगचा सराव करताना दिसला पंत (VIDEO)
13
Sonam Raghuvanshi : सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड?
14
२३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य
15
वेळीच व्हा सावध! सोमवारीच का असतो हार्ट अटॅकचा सर्वाधिक धोका? 'या' गोष्टी कारणीभूत
16
तुमच्या नावे कोणी बनावट लोन तर घेतलं नाहीये ना? घरबसल्या पॅन कार्डावरुन कसं तपासाल, दिसलं तर काय कराल?
17
७/११तील सर्व दोषी निर्दोष; असदुद्दीन ओवेसी म्हणतात, “गेली १७ वर्षे निष्पाप लोक जेलमध्ये...”
18
“कृषीमंत्री रमीत रमतो, हनीट्रॅपचा फास सत्ताधाऱ्यांच्या गळ्यात, उच्चस्तरीय चौकशी करा”: सपकाळ
19
सचिन पिळगावकरांनी घेतलेली मधुबालाची भेट, म्हणाले, "ती बाई जितकी सुंदर होती त्यापेक्षा १० पटीने..."
20
MBA ग्रॅज्युएट चोर; २० वर्षांत चोरल्या १०० हून अधिक आलिशान गाड्या, असा लागला पोलिसांच्या हाती

उघड्यावरील पदार्थांमुळे आरोग्यास धोका

By admin | Updated: February 28, 2017 02:34 IST

दुकानातील खाद्यपदार्थ खाल्ल्याने जवळपास २० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला.

वैभव गायकर,पनवेल- खारघरमधील डेल्ली बेल्ली या उघड्यावर सुरू असलेल्या दुकानातील खाद्यपदार्थ खाल्ल्याने जवळपास २० जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार गेल्या आठवड्यात उघडकीस आला. सर्वोच्च न्यायालयाने उघड्यावरील खाद्यपदार्थांच्या विक्रीस बंदी घातली आहे. असे असले तरी त्यांची सर्रास विक्री सुरू असून ते जीवघेणे ठरू शकतात, हे समोर येत आहे. विषबाधा झाल्यानंतर बाधितांपैकी कोणीही तक्रार दाखल करण्यास पुढे आले नाही. मात्र शनिवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी एकास अटक केली. डेल्ली बेल्ली या दुकानातून शोरमा व बिर्याणी खाल्ल्याने वीस जणांना विषबाधा झाली असून यात एका तीन वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे. रविवारी पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी विषबाधा झालेल्या रुग्णांची भेट घेतली. शिवाय उघड्यावरील खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचेही स्पष्ट केले. हॉटेल्स, रेस्टॉरंटपेक्षा स्वस्त आणि झटपट खाद्यपदार्थ उपलब्ध होत असल्याने अनेक जण रस्त्यावर, नाक्यानाक्यावर विकल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांना पसंती देतात. विनापरवाना सुरू असलेल्या या दुकाने, स्टॉलवरील खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत नेहमीच प्रश्नचिन्ह उभे राहत आहे. खारघरमधील घटनेनंतर तरी नागरिकांनी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता आहे. रेल्वे, बस स्थानक, शहरातील मुख्य चौक, सिग्नल्सवर, रस्त्याच्या कडेला विनापरवाना खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या शेकडो गाड्या, दुकाने, स्टॉल्स दिसतात. याठिकाणी कोणतीही नियमावली पाळली जात नाही. शिवाय दर्जाबाबतही शाश्वती नसल्याने आरोग्याशी खेळ होतो. वडापाव, भेळपुरी, पाणीपुरी, मिसळपाव, पावभाजी, बिर्याणी, चायनीज आदी दुकानांचा यात समावेश असून पंचतारांकित हॉटेल्स, रेस्टॉरंटपेक्षा रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सवर बऱ्याचदा जास्त गर्दी दिसते. उघड्यावरील खाद्यपदार्थ आरोग्यास बाधक असल्याने स्थानिक स्वराज्य संस्था, पालिका, नगरपरिषदेकडून याबाबत वारंवार जनजागृती करण्यात येते. मात्र नागरिकांच्या दुर्लक्षामुळे विषबाधेसारखे प्रकार घडतात. सध्या तापमान प्रचंड वाढल्याने खाद्यपदार्थ लवकरच खराब होतात. असे पदार्थ खाल्ल्याने उलट्या, जुलाब, पोट खराब होणे, मळमळ, सर्दी, ताप आदी व्याधी जडत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. उघड्यावर अन्नपदार्थ बनवताना अनेकदा घरगुती सिलिंडरचा वापर केला जातो. याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना नसतात. त्यामुळे एखाद्यावेळी अनुचित घटना घडल्यास किंवा गॅसचा भडका झाल्यासही मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.काही वर्षांपूर्वी चायनीज खाल्ल्याने विषबाधा होऊन ठाण्यातील दोघींना आपला जीव गमवावा लागला होता. याशिवाय अन्नपदार्थांत अळ्या सापडणे, खराब झालेल्या अन्नपदार्थांवर प्रक्रिया करून पुनर्वापर करणे आदी प्रकार अनेकदा उघडकीस आले आहेत. त्यामुळे बेकायदेशीररीत्या सुरू असलेल्या खाद्यपदार्थांच्या विक्रीवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे.>खारघरमधील २०-२२ जणांना विषबाधा झाल्याची घटना अत्यंत गंभीर आहे. नागरिकांनी शक्यतो उघड्यावरील पदार्थ खाणे टाळावे, याठिकाणी वापरण्यात येणारे पाणीही दूषित असते. त्यामुळे जीवितास धोका उद्भवू शकतो. महापालिकेच्या अधिकारात असलेल्या नियमानुसार खारघरमधील विषबाधाप्रकरणी जबाबदार व्यक्तीवर कठोर कारवाईसाठी प्रयत्न सुरू आहेत. याशिवाय उघड्यावर खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांवर तीव्र कारवाई सुरू करण्यात आली आहे. - डॉ. सुधाकर शिंदे, आयुक्त पनवेल महानगरपालिकाहॉटेलमालकाला अटकखारघरमध्ये शोरमा व बिर्याणी खाल्ल्याने २० पेक्षा जास्त नागरिकांना विषबाधा झाली होती. त्यांच्यावर खारघरमधील विविध खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. खारघर पोलिसांनी याठिकाणी काम करणाऱ्या रईस रफिक शेख याला रविवारी अटक केली, मात्र हॉटेलचा मालक सय्यद जमालुद्दीन खान हा फरार होता. खानला सोमवारी अटक करण्यात आली. खारघरमधील विषबाधेची माहिती आम्ही पनवेल महापालिका, तसेच अन्न व औषध प्रशासनालाही दिली आहे. यामध्ये खारघर परिसरातील दवाखान्यात दाखल झालेल्या रुग्णांची व त्यांच्या उपचारासंदर्भात माहिती आहे. उघड्यावरील खाद्यपदार्थ खाल्ल्याने उलट्या, सर्दी- खोकला, घसा बसणे, जळजळ आदी आजार उद्भवतात. त्यामुळे असे पदार्थ खाणे टाळले पाहिजे. - डॉ. मनीषा मातकर, अध्यक्ष, खारघर डॉक्टर्स असोसिएशन