शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

एसटीला अतिरिक्त तिकिटांची डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2019 05:48 IST

वाहक देतात महिन्याला ५ हजार अतिरिक्त तिकिटे; उलटतपासणीचे आदेश

मुंबई : एसटीमधील वाहकांकडून प्रवाशांना अतिरिक्त तिकिटे दिल्याची मोठी डोकेदुखी एसटी प्रशासनाला सहन करावी लागत आहे. महिन्याला सुमारे ५ हजारांहून अधिक अतिरिक्त तिकिटे दिल्याची माहिती समोर ठेवत एसटीने यामध्ये काही गैरव्यवहार तर होत नाही ना, याची उलटतपासणी करण्याचे आदेश विभाग नियंत्रकांना दिले आहेत.या वर्षी एसटीमधील वाहकांनी प्रवाशांना जानेवारी महिन्यात ५ हजार ११ आणि फेब्रुवारीमध्ये ५ हजार २१५ अतिरिक्त तिकिटे दिल्याची माहिती आहे. अतिरिक्त तिकिटे देण्याच्या कारणामुळे काही ठिकाणी वाहकांनी अपहार केल्याची प्रकरणे घडल्यामुळे प्रशासनाने याबाबतीत गंभीर दखल घेतली आहे. तसेच प्रतिबंधात्मक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मोठ्या संख्येने अतिरिक्त तिकिटे दिल्याने व त्यावर नियंत्रण न ठेवल्याने अपहार करण्यासाठी वाहकांना संधी मिळत असल्याची भीतीही प्रशासनाने व्यक्त केली आहे. म्हणूनच वाहकांकडून देण्यात येणाऱ्या कारणांची उलटतपासणी करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.अहवाल सादर करण्याचे आदेशअतिरिक्त तिकिटे देण्याची वेळ नव्या प्रणालीमुळे येता कामा नयेत, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. या प्रकरणी वाहकांनी दिलेली कारणे तसेच वैधता तपासल्यानंतर येणारा अहवाल तातडीने मध्यवर्ती कार्यालयात सादर करण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळ