शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

बँक ऑफ महाराष्ट्रची कॉर्पोरेट, कृषी कर्जाची डोकेदुखी कायम..

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 13:23 IST

 बड्या कॉर्पोरेट कंपन्यांची थकीत कर्जे बँकेची डोकेदुखी डिसेंबरअखेरीस १३५ कोटी रुपये नफा

ठळक मुद्देडिसेंबरअखेरीस १३५ कोटी रुपये नफा गेल्या वर्षभरात भारत सरकारने बँकेतील गुंतवणूक ८७ वरून ९२.४९ टक्क्यांपर्यंत वाढविलीराष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) साडेबारा हजार कोटी रुपयांचे दावे गेल्या चार तिमाहींतील यंदाची कामगिरी सर्वोत्तम

पुणे : बड्या कॉर्पोरेट कंपन्या आणि कृषी कर्जाच्या वाढत्या थकबाकीची बँक ऑफ महाराष्ट्रची डोकेदुखी कायम आहे. एकूण १५ हजार ७४६ कोटींच्या थकीत कर्जापैकी एकतृतीयांशाहून अधिक कर्ज या दोन क्षेत्रांतील आहे. मात्र, थकीत कर्जाची वसुली, अंतर्गत खर्चात केलेली कपात यामुळे यंदा बँकेने डिसेंबर २०१९ अखेरीस तब्बल १३५ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या चार तिमाहींतील यंदाची कामगिरी सर्वोत्तम ठरली आहे.  बँक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. राजीव यांनी सोमवारी तिसऱ्या तिमाहीचा अहवाल सादर केला. कार्यकारी संचालक ए. सी. राऊत, हेमंतकुमार टम्टा या वेळी उपस्थित होते. बँकेने डिसेंबर २०१८ला असलेल्या तब्बल ३ हजार ७६४ कोटींच्या तोट्याच्या तुलनेत यंदा १३५ कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. तसेच, चालू व बचत खात्यातील रकमेत ६३ हजार ७५६ कोटी रुपयांवरून २६ हजार २४६ कोटींपर्यंत (७.०४ टक्के) वाढ झाली आहे. या काही जमेच्या बाजू आहेत. गेल्या वर्षभरात भारत सरकारने बँकेतील गुंतवणूक ८७ वरून ९२.४९ टक्क्यांपर्यंत वाढविली आहे.  बड्या कॉर्पोरेट कंपन्यांची थकीत कर्जे बँकेची डोकेदुखी ठरत आहेत. त्यात डीएचएलएफ, रेलीगेअर यासारख्या कंपन्यांच्या थकीत कर्जांचाही समावेश आहे. डिसेंबर २०१८अखेरीस ३९,२०७ कोटींपैकी ८,२९१ कोटींची (२१.१५ टक्के) बडी कॉर्पोरेट कर्जे थकीत होती. डिसेंबर २०१९अखेरीस ३८,१३१ कोटींपैकी थकीत कर्जाचे प्रमाण ८,८८१ कोटींपर्यंत (२३.२९ टक्के) वाढले आहे. राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे (एनसीएलटी) साडेबारा हजार कोटी रुपयांचे दावे प्रलंबित आहेत. त्यावर प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच यातील काही कर्जाची वसुली होईल, असे बँक व्यवस्थापनाकडूून सांगण्यात आले. डिसेंबर २०१८अखेरीस १४,०९४ कोटींपैकी २,९७१ (१९.८८ टक्के) कोटी रुपयांची कृषी कर्जे थकीत होती. डिसेंबर २०१९अखेरीस १५,६०१ कोटींपैकी ३,५३२ (२२.६४ टक्के) हजार कोटी रुपये थकीत आहेत. गृह, शिक्षण व वाहन या रिटेल (किरकोळ) व लघु व मध्यम उद्योगातील थकीत कर्जाचे प्रमाण कमी करण्यात बँकेला यश आले आहे. त्यामुळे या क्षेत्रात बँकेकडून अधिक पतपुरवठा करण्यात येत असून, कॉर्पोरेट क्षेत्रातील पतपुरवठ्यात थोडी घट झाली आहे...............          किरकोळ क्षेत्रातील एनपीए                     डिसेंबर-२०१८                                         डिसेंबर २०१९क्षेत्र                 दिलेले कर्ज    एनपीए    टक्के       दिलेले कर्ज    एनपीए       टक्केगृह                        १२,८९३    ६४५         ५            १३,९९६          ५८९             ४.२१शिक्षण                  १,०९४     ११४       १०.४०          १,२०८          ७९               ६.५४वाहन                      १,२५८    ४३          ३.४५          १,४४८          ४२               २.८८

 

टॅग्स :PuneपुणेBank of Indiaबँक ऑफ इंडिया