अंतर्गत रक्तस्त्रावाने मुंडेचा झाला मृत्यू

By Admin | Updated: June 3, 2014 18:59 IST2014-06-03T15:50:50+5:302014-06-03T18:59:16+5:30

केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू अंतर्गत रक्तस्त्रावामुळे झाल्याची शक्यता वर्तवली जात असून या दुखापतीमुळे त्यांना ह्रदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जाते.

Headache caused by Munda's death | अंतर्गत रक्तस्त्रावाने मुंडेचा झाला मृत्यू

अंतर्गत रक्तस्त्रावाने मुंडेचा झाला मृत्यू

ऑनलाइन टीम

नवी दिल्ली, दि. ३ - अपघातात केंद्रीय मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या यकृताला व मणक्याला भीषण दुखापत होऊन अंतर्गत रक्तस्त्राव झाल्याने मुंडेंचा मृत्यू झाल्याचे समजते.  'एम्स' हॉस्पिटलमधील शवविच्छेदनावरुन ही माहिती समोर आली आहे. अपघातात जबर धक्का बसल्याने त्यांना हृदय विकाराचा झटका आला. दरम्यान मुंडेंच्या मृत्यूला कारणीभूत ठरावी अशी एकही खोल जखम बाह्य भागावर झालेली दिसत नव्हती', असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान  अपघाताच्यावेळी मुंडे हे झोपले असावेत. अपघाताच्या धक्क्याने ते सीटच्या समोरील भागावर जाऊन आदळले असावे, असे केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन म्हणाले. पुढच्या भागावर आदळल्याने त्यांच्या नाकावर व डोक्यावर किरकोळ दुखापत झाली. मात्र यकृताला व मणक्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाली. या दुखापतीत हृदयाला रक्तस्त्राव करणा-या रक्तवाहिनीला धक्का बसला असावा व यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला असावा अशी शक्यताही त्यांनी वर्तवली. 

Web Title: Headache caused by Munda's death