शहरं
Join us  
Trending Stories
1
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
2
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
3
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
4
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
5
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
6
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
7
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
8
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
9
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
10
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
11
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
12
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
13
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
14
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
15
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
16
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
17
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
18
युनूस सरकार बघ्याच्या भूमिकेत; ढाक्यात हिंदू व्यावसायिकाची निर्घृण हत्या; हल्लेखोर मृतदेहावर नाचले
19
रस्त्याने जात असताना कारवर पडले दगड, भयंकर भूस्खलनातून थोडक्यात बचावले माजी मुख्यमंत्री
20
रिंकू राजगुरूचा सिंपल पण स्टायलिश लूक, फोटो नाही तर कॅप्शनने वेधलं सर्वांच लक्ष

दुभाजकावर डोके आपटून तरुणी ठार

By admin | Updated: April 19, 2016 01:28 IST

भरधाव दुचाकी समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या दुचाकीला धडकल्यामुळे चालक तरुणीचा दुभाजकावर आदळून रस्त्यावर डोके आपटल्यामुळे जागीच मृत्यू झाला.

पुणे : भरधाव दुचाकी समोर उभ्या असलेल्या दुसऱ्या दुचाकीला धडकल्यामुळे चालक तरुणीचा दुभाजकावर आदळून रस्त्यावर डोके आपटल्यामुळे जागीच मृत्यू झाला. हा अपघात सिंहगड रस्त्यावर सोमवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडला. अपघातानंतर या तरुणीचा मृतदेह तब्बल पाऊणतास अपघातस्थळीच पडून होता. वाहतूककोंडीमुळे रुग्णवाहिका पोचायला उशीर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. विशेष म्हणजे त्यांनी हेल्मेट घातलेले असतानाही त्यांच्या डोक्याला जबर दुखापत झाली. सुप्रिया सोपान शिळीमकर (रा. सूर्यगंगा सोसायटीजवळ, पासुडी, धायरीगाव) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुप्रिया पती अणि दोन मुलांसह वडगाव धायरीमध्ये राहण्यास होत्या. जंगलीमहाराज रस्त्यावरच्या एका खासगी सीएकडे त्या अकाऊंटंट म्हणून नोकरी करत होत्या. नेहमीप्रमाणे त्या सोमवारी सकाळी हेल्मेट घालून दुचाकीवरून कामावर जात होत्या. सिंहगड रस्त्यावरील रांका ज्वेलर्स येथील सिग्नल सुटल्यानंतर त्या विठ्ठलवाडीच्या पुढे आल्या. दुचाकीवरील नियंत्रण सुटल्यामुळे त्यांनी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रासमोरच एका दुचाकीला पाठीमागून धडक दिली. वेग जास्त असल्यामुळे त्यांचे शरीर तीन ते चार वेळा गोल फिरत लांबवर फेकले गेले. त्यांच्या डोक्यावर असलेल्या हेल्मेटचा आकार लहान असल्यामुळे त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. अपघातस्थळाजवळच थांब्यावर जाण्यासाठी नेमकी त्याच वेळी एक पीएमपीची बस गेली. अपघात पाहून प्रवाशांनी आरडाओरडा करताच चालकाने बस थांबवली. पीएमपी बस थांबल्यामुळे बसखाली आल्यानेच हा अपघात झाल्याची अफवा पसरत गेली. सुप्रिया यांच्या पर्समध्ये मिळालेल्या आधारकार्डवरून त्यांची ओळख पटवण्यात आली. ससून रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. > दुचाकी चालकांनी हेल्मेट चांगल्या दर्जाचे, आयएसआय मार्क असलेले तसेच तपासूनच वापरावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. ‘लोकमत’ने हेल्मेट वापराबाबत कायमच जनजागृती केली असून, जीव महत्त्वाचा असल्यामुळे अन्य कोणत्याही वादविवादापेक्षा हेल्मेट वापरणे अत्यावश्यक असल्याचे नुकतेच मालिकेद्वारे मांडले होते.