शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

सायकलच्या चाकांवरून तो पाहतोय जग

By admin | Updated: November 4, 2016 01:53 IST

इंग्लंडच्या वेल्स विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यावर वकिली व्यवसायात स्थिरावण्याऐवजी, त्याने चक्क सायकलला पायडल मारले आणि निघाला जगाच्या भ्रमंतीला

आमोद काटदरे,

ठाणे- इंग्लंडच्या वेल्स विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यावर वकिली व्यवसायात स्थिरावण्याऐवजी, त्याने चक्क सायकलला पायडल मारले आणि निघाला जगाच्या भ्रमंतीला. तब्बल २३ देश पालथे घातल्यानंतर, जोशाह स्केट््स सध्या भारतात फिरतो आहे. कन्याकुमारीहून सायकलवर स्वार झालेला जोशाह, गेले पाच दिवस ठाणे जिल्ह्यात ठाकुर्लीला मुक्कामाला होता. आतापर्यंत १६ हजार किलोमीटर अंतर सायकलवरून कापलेल्या जोशाहने, दिवाळीच्या फराळापासून आयुष्यात प्रथमच फटाके वाजवण्यापर्यंतची मौज लुटली आणि शुक्रवारी सकाळपासून तो पुढच्या मुक्कामासाठी रवाना होतो आहे.लंडनपासून तासाभरावर असलेल्या कँटरबरीचा रहिवासी असलेला जोशाह अवघ्या २३ वर्षांचा. या ध्येयवेड्याने प्रथम वर्षाचे शिक्षण घेत असतानाच, सायकलद्वारे जगभ्रमंती केलेल्या व्यक्तीवरचा लेख आॅनलाइनवर वाचला आणि तेव्हाच अशा अचाट मोहिमेचे बीज त्याच्या डोक्यात पेरले गेले. याच काळात त्याने फ्रान्स आणि अमेरिकेत प्रत्येकी सहा महिने नोकरी केली. त्यातून जमा झालेल्या पुंजीतून तो गेल्या वर्षी २४ मे पासून सायकलवरून युनायटेड किंगडम ते आॅस्ट्रेलियाच्या भ्रमंतीला निघाला. ही मोहीम अवघड आणि अतिशय खडतर असल्याने, असे साहस न करण्याचा सल्ला मित्रांनी दिला, पण कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे त्याने हे शिवधनुष्य पेलले. पहिल्या दिवशी पाच मित्रांनीही त्याच्या मोहिमेत सहभागी होत, त्याला साथ दिली.एकदाच मिळणाऱ्या आयुष्यात जगभरातील उत्कृष्ट शहरे, विविध ठिकाणे पाहायची. जगभरातील माणसांना भेटायचे, नवे अनुभव घ्यायचे, त्याच्या आठवणी जपण्यासाठी या मोहिमेवर निघाल्याचे जोशाहने सांगितले. इंग्लंडमधून निघाल्यानंतर, त्याने १० दिवस फ्रान्स, स्वित्झर्लंडमध्ये तीन दिवस, जर्मनीत २० दिवस आणि आॅस्ट्रियात २० दिवस भ्रमंती केली. >पोहे, करंजी आवडलीअनेकदा लोकांच्या-सायकलप्रेमींच्या घरी राहात असल्याने, भारतातील प्रवास खर्च दरदिवशी १०० रुपये असल्याचे तो सांगतो. कोचीत एका सायकलिंग क्लबने त्याला मदत दिली. सध्या ठाकुर्लीत तो सायकलप्रेमी कुणाल भावे यांच्या घरी पाच दिवस मुक्कामाला होता. ऐन दिवाळीत फटाक्यांची आतषबाजी, फराळाचा आस्वाद त्याने घेतला. >पुन्हा भारतात येणारठाकुर्लीतून तो शुक्रवारी सकाळी अहमदाबादला रवाना होणार आहे. जयपूर, आग्रा, दिल्लीमार्गे तो नेपाळला जाईल. दीड महिन्यात त्याला हा टप्पा गाठायचा आहे. भारताचा व्हिसा तीन महिन्यांचाच मिळाल्याने, पुन्हा नेपाळमधून तो भारतीय व्हिसासाठी अर्ज करणार आहे. नेपाळमार्गे भारतात प्रवेश करून ईशान्येकडील देशांमधून म्यानमार, थायलंड, व्हिएतनाम, आणि पुढे न्यूझिलंडला जाईल. >दैनंदिन प्रवास : जोशाहचा प्रवास दररोज सकाळी ६ वाजता सुरू होतो. रोज किमान ८०-१०० कि.मी.चे अंतर कापण्याचे त्याचे ध्येय असते. दर दोन तासांनी तो विश्रांती घेतो. प्रवासात तो फक्त फळे आणि हलका आहार घेतो. काही ठिकाणी भाषेची अडचण जाणवते, पण खाणाखुणा करून वेळ मारून न्यावी लागते, असे अनुभवही त्याने सांगितले.