शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमधील धक्कादायक घटना! पत्नीच्या निधनाची वार्ता समजताच पतीनेही मृत्यूला कवटाळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 14:47 IST

श्रमिकनगर माळी कॉलनीत राहणारे रवींद्र तुळशीराम पवार ( 52) यांच्या पत्नी संगीता पवार (45) यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी सोमवारी रात्रीच्या सुमारास स्वतः पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते.

नाशिक :- जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पत्नीचा मंगळवारी (दि.30) पहाटेच्या सुमारास मृत्यू झाल्याची माहिती समजताच हा धक्का पचवू न शकल्याने सकाळी पतीनेही राहत्या घरी गळफास घेत मृत्युला कवटाळले. ही धक्कादायक घटना नाशिकमधील सातपुर भागातील श्रमीकनगर वसाहतीत घडली. या घटनेने संपुर्ण शहर हादरले असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

श्रमिकनगर माळी कॉलनीत राहणारे रवींद्र तुळशीराम पवार ( 52) यांच्या पत्नी संगीता पवार (45) यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी सोमवारी रात्रीच्या सुमारास स्वतः पवार यांनी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचा मोठा  मुलगा आणि मुलगी देखील होते. वडिलांना घरी पाठवून भाऊ, बहीण रुग्णालयातच आईजवळ थांबलेले होते. उपचार सुरु असताना मंगळवारी पहाटेच्या सुमारास संगीता पवार यांना वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले.मातृछत्र हरपल्याने या भावंडांवर दुःखाचा डोंगर कोसळला आणि दोघांनी रुग्णालयातच टाहो फोडला. पवार यांच्या मुलाने स्वतः ला सावरत  वडिलांना मोबाईल वर संपर्क करुन ही दुःखद वार्ता कळविली.

बराच वेळ होऊनही वडील रुग्णालयात म पोहोचल्याने मुलाने पुन्हा वडिलांना वारंवार फोन केला. मात्र कुठलाही प्रतिसाद न आल्याने मुलाने शेजारच्या कुटुंबियांना फोन करुन वडिलांची माहिती घेण्यास सांगितले. शेजाऱ्यांनी रवींद्र पवार यांच्या घराचा दरवाजा वाजवून आवाज दिला. घरातून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने त्यांनी खिडकीतून आतमध्ये डोकावून बघितले असता पवार यांनी छताच्या पंख्याला साडीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. शेजाऱ्यांनी त्वरित ही माहिती मुलाला कळविली. यावेळी एकाचवेळी मातृ-पितृ छत्र नियतीने हिरावून घेतल्याने या भाऊ बहिणींच्या अश्रुंचा बांध फुटला. दोघेही एकमेकांना धीर देत ढसाढसा रडत होते यावेळी रुग्णालयातील अन्य नागरिकांनी त्यांच्याजवळ जात समजावून धीर देण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवी घटनेने सातपूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.आहे.याबाबत भाजपा सातपूर मंडलाचे अध्यक्ष अमोल इंघे यांनी अशोकनगर पोलीस चौकीत जाऊन घटनेची प्राथमिक माहिती दिली.सातपूर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

मध्यमवर्गीय सामान्य कुटुंब

मयत रवींद्र पवार हे सातपूर औद्योगिक वसहतीतील एका कंपनीत ठेकेदारीवर सुरक्षा रक्षक म्हणून नोकरीला होते. परंतु गेल्या वर्षभरापासून ते घरीच राहत असल्याचे सांगण्यात आले. मयत पवार दाम्पत्याच्या पश्चात मोठा मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे.  मुलगा हादेखील रोजंदारीवर एका खासगी कारखान्यात कामाला जातो. पवार यांचे अत्यंत सामान्य गरीब कुटुंब होते. या कुटुंबाचा आधारच आता नियतीने हिरावून घेतल्याने भावंडांवर आकाश फाटले आहे.

टॅग्स :Policeपोलिस