शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
3
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
4
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
5
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
6
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
7
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
8
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
9
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
10
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
11
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
12
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
13
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
14
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
15
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
16
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
17
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
18
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
19
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
20
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

हद्दीचा वाद मिटवून जनहिताची कामे करणार

By admin | Updated: August 6, 2016 03:07 IST

हद्दीच्या वादात रखडल्याचा आरोप शुक्रवारी प्रभाग क्र. ६ मध्ये ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमात नागरिकांनी केला

ठाणे : रस्ते, पायवाटा, गटारे, शौचालयांची न झालेली दुरुस्ती, स्मशानभूमीची दुरवस्था आदी ढोकाळी, मनोरमानगर परिसरांतील समस्या प्रभागातील हद्दीच्या वादात रखडल्याचा आरोप शुक्रवारी प्रभाग क्र. ६ मध्ये ‘लोकमत’ने आयोजित केलेल्या ‘लोकमत आपल्या दारी’ या कार्यक्रमात नागरिकांनी केला. त्यावर, हद्दीचा वाट मिटवून विरोधक जर एकदिलाने काम करण्यास तयार असतील, तर आणि तरच येथील कामे होऊ शकतील, असे परखड प्रतिपादन विरोधी पक्षनेते तथा राष्ट्रवादीचे स्थानिक नगरसेवक संजय भोईर आणि उषा भोईर यांनी केले. यापुढे हद्दीचा वाद चघळत न बसता जनतेच्या समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासनही त्यांनी या वेळी दिले. ढोकाळी येथील शरदचंद्र पवार मिनी स्टेडिअममध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला स्थानिक नगरसेवक संजय भोईर आणि उषा भोईर आणि देवराम भोईर उपस्थित होते. या वेळी नागरिकांनी उत्स्फूर्तपणे आपल्या समस्या मांडल्या. विरोधाला विरोध न करता अनेक समस्यांचा पाढा वाचला. त्याला या दोन्ही नगरसेवकांनी समर्पक उत्तरे दिली. मनोरमानगर भागात असलेल्या शौचालयांच्या समस्या, शहानगरची पाण्याची समस्या हद्दीच्या वादात अडकली असून काम सुरू असताना येथील पाइप चोरीला कसे जातात, असा सवाल एका महिलेने उपस्थित केला. ज्या ठिकाणी कचरापेटीची आवश्यकता आहे, त्या ठिकाणी त्या न ठेवता दुसऱ्या ठिकाणी का ठेवल्या जातात. कचरापेट्यांची संख्या वाढवण्याची मागणीदेखील रहिवाशांनी केली. परिवहनच्या बसची संख्या वाढवतानाच ही सेवा हायलॅण्डमार्गे न ठेवता पुन्हा कापूरबावडीमार्गे वळवण्याची मागणी रहिवाशांनी केली. या समस्या मांडतानाच काही नागरिकांनी नगरसेवकांनी केलेल्या कामांचे कौतुकही केले.यासंदर्भात संजय भोईर यांनी सांगितले की, मनोरमानगरसाठी बसेसची संख्या वाढवण्याकरिता प्रयत्न सुरू असून नव्याने परिवहनमध्ये दाखल होणाऱ्या १९० बसपैकी या मार्गावर बसेस वाढवण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा सुरू आहे. मनोरमानगर ही हायलॅण्डमार्गे वळवण्यात आल्याने परिवहनचे उत्पन्न वाढल्याकडे त्यांनी नागरिकांचे लक्ष वेधले. मनोरमानगर भागातील रखडलेला रस्ता आणि शहानगरच्या पाणीसमस्या सोडवण्यासाठी मी हद्दीचा वाद विसरण्यास तयार आहे. परंतु, समोरचे जर काम सुरू असताना आडकाठी करीत असतील तर मी काम कसे करायचे, असा प्रतिसवालही भोईर यांनी नागरिकांना केला. परंतु, तुमची तयारी असेल तर मी हद्दीचा वाद बाजूला ठेवण्यास तयार आहे.