शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
3
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
4
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
5
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
6
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
7
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
8
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
9
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
10
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

"चुकीचे काम करतो, तोच माफी मागतो, भ्रष्टाचारामुळेच छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला", राहुल गांधी यांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 07:21 IST

Rahul Gandhi Criticize Narendra Modi: चुकीचे केल्यानंतरच माफी मागितली जाते. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांची माफी मागितली; मात्र त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचीही माफी मागितली पाहिजे, असे मत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी व्यक्त केले.

- हणमंत पाटील, अविनाश कोळीकडेगाव (जि. सांगली)  - मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा भ्रष्टाचारामुळेच कोसळला. चुकीचे केल्यानंतरच माफी मागितली जाते. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवाजी महाराजांची माफी मागितली; मात्र त्यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीचीही माफी मागितली पाहिजे, असे मत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी गुरुवारी व्यक्त केले.

कडेगाव येथे दिवंगत काँग्रेस नेते डॉ. पतंगराव कदम यांचा पूर्णाकृती पुतळा व लोकतीर्थ स्मारकाचा लोकार्पण सोहळा गुरुवारी पार पडला. यानंतर झालेल्या सभेत ते बोलत होते.   राहुल गांधी म्हणाले, पतंगराव कदम यांनी ६० वर्षे पारदर्शक व प्रामाणिकपणे काम केले. त्यांनी आयुष्यात कधी माफी मागितली नाही; कारण चुकीचे काम केले तरच माफी मागावी लागते. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्यानंतर कोणत्या कारणाने पंतप्रधान यांनी माफी मागितली? पहिले कारण म्हणजे आरएसएसच्या व्यक्तीला कंत्राट दिले. त्याच्या दर्जाकडे दुर्लक्ष केले गेले. चुकीच्या व्यक्तीला काम दिल्याने आणि भ्रष्टाचार झाल्याने पुतळा कोसळला. हा महाराष्ट्राचा अवमान आहे. त्यामुळे मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागायला हवी.

देशात सध्या विचारधारेचे युद्ध सुरू आहे. धर्माधर्मांत, जातीजातींत आणि भाषेवरून वाद निर्माण करून त्यांना द्वेष पसरवायचा आहे. या विचारधारेविरुद्ध आमची लढाई आहे, असे गांधी म्हणाले.

पतंगराव कदम यांचे योगदान मोलाचे : शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या  शिक्षण क्षेत्रात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी, शिक्षणतज्ज्ञांनी मोठे योगदान दिले. यात आधुनिक काळात पतंगराव कदम यांचे योगदानही मोलाचे आहे. 

महाराष्ट्र गहाण ठेवू नका : खरगे मतांसाठी ‘लाडकी बहीण’चे आमिष दाखविले आहे. जनतेने दीड ते दोन हजार रुपयांसाठी नरेंद्र मोदींकडे महाराष्ट्राचा स्वाभिमान गहाण ठेवू नये. त्यांच्या पैशाला ठोकर मारून संविधान संपवू पाहणाऱ्या भाजप सरकारला धडा शिकवावा, असे आवाहन काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केले.

सोनिया गांधींशी भावनिक नाते : कदमदेशाच्या स्वराज्याची लढाई सांगलीतून सुरू झाली, याचा अभिमान आहे. सोनिया गांधी यांच्याशी कदम कुटुंबाचे भावनिक नाते आहे, अशी भावना डॉ. विश्वजीत कदम यांनी प्रास्ताविकात बोलून दाखविली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजRahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदी