लातूर : एमबीबीएस तृतीय वर्ष ईएनटी विभागाचा पेपर फुटल्याप्रकरणी महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाने राज्यातील सर्वच महाविद्यालयांकडून परीक्षा केंद्रांचा अहवाल शनिवारी तातडीने मागविला आह़े तसेच पेपर फोडणा:या एसएमएसच्या उगमस्थानाचा शोध सुरू झाला आहेत.
राज्यात 14 शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि 28 खाजगी वैद्यकीय महाविद्यालयांतील विद्याथ्र्यासाठी 123 केंद्रांवर या परीक्षा सुरू आहेत़ एमबीबीएस तृतीय वर्षातील ईएनटी विभागाचा पेपर 28 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीच वाजता होता़ परंतु यातील संभाव्य प्रश्नांचा एसएमएस त्याच दिवशी सकाळी अनेकांच्या मोबाइलवर झळकला़ यातील 3क् प्रश्न जसेच्या तसे उमटले. ही धक्कादायक बातमी शनिवारी ‘लोकमत’मध्ये उमटताच विद्यापीठ व महाविद्यालयीन यंत्रणोत खळबळ उडाली आहे.
लातूरचा अहवाल
काय सांगतो?
5 लिफाफ्यांपैकी 4 लिफाफे वापरण्यात आल़े येथील स्ट्राँग रूम कॅमे:याच्या निगराणीखाली आह़े तसेच प्रत्येक परीक्षा हॉलवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत़ परीक्षेपूर्वी अर्धा तास साक्षीदारांच्या उपस्थितीत स्ट्राँग रूम उघडली जात़े शनिवारी तातडीने आरोग्य विद्यापीठाला ही माहिती दिल्याचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ अशोक शिंदे यांनी सांगितले. परीक्षेबाबतचा एसएमएस अन्य ठिकाणाहून आला असेल़, असा दावाही त्यांनी केला.