शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

SBI मध्ये अर्ज केला का? मोठ्या भरतीसाठी फक्त दोन दिवस शिल्लक

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2020 14:43 IST

SBI Apprentice Application 2020 : देशाची सर्वात मोठी सार्वजिक बँक एसबीआयला भविष्यात १४ ते १५ हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. यासाठी एसबीआयने पहिल्या टप्प्यात निम्म्या जागा भरण्याचा निर्णय घेतला असून भरती सुरु करण्यात आली आहे.

देशाची सर्वात मोठी सार्वजिक बँक एसबीआयला भविष्यात १४ ते १५ हजार कर्मचाऱ्यांची गरज आहे. यासाठी एसबीआयने पहिल्या टप्प्यात निम्म्या जागा भरण्याचा निर्णय घेतला असून भरती सुरु करण्यात आली आहे. या भरतीचा १० डिसेंबर हा शेवटचा दिवस आहे. म्हणजेच अर्ज करण्यासाठी केवळ दोन दिवस शिल्लक आहेत. इच्छुकांना लगेचच तयारी करून अर्ज भरावा लागणार आहे. सर्व लिंक बातमीच्या शेवटी दिलेल्या आहेत. 

 एसबीआयने देशातील विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात पसरलेल्या आपल्या ब्रँचमध्ये अप्रेंटिसच्या ८ हजार ५०० रिक्त जागा भरण्यासाठी आजपासून ऑनलाइन प्रक्रिया सुरू केली आहे. जे उमेदवार एसबीआयमध्ये अप्रेंटिसशिप करू इच्छितात त्यांनी बँकेचे अधिकृत संकेतस्थळ असलेल्या sbi.co.in वर जाऊन निर्धारित प्रक्रियेचा अर्ज करावा.

एसबीआय़कडून जारी करण्यात आलेल्या अप्रेंटिस भरती जाहिरातीनुसाऱ इच्छुक उमेदवार आपला एसबीआय अप्रेंटिस अ‍ॅप्लिकेशन २०२० पुढील १० डिसेंबरपर्यंत सबमिट करू शकतील.

कुणाला करता येईल अर्जएसबीआय अप्रेंटिस भरती प्रक्रियेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठीची पात्रता पुढीलप्रमाणे आहे. इच्छुक उमेदवार कुठल्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असावा. उमेदवाराचे वय किमान २० वर्षे आणि कमाल २८ वर्षे असावे. आरक्षित वर्गाच्या उमेदवारांना वयाच्या अटीत सवलत देण्यात आली आहे.

अशी होणार निवडएसबीआय अप्रेंटिस भरती २०२०२ साठी उमेदवारांची निवड ही ऑनलाइन लिखित परीक्षा आणि स्थानिक भाषेच्या आधारावर केली जाईल. पहिल्या टप्प्यात ऑनलाइन लेखी परीक्षा आणि स्थानिक भाषा परीक्षेच्या आधारावर होईल. पहिल्या टप्प्यातील ऑनलाईन लेखी परीक्षा जानेवारी २०२१ मध्ये आयोजित केली जाईल. ज्यामध्ये जनरल/फायनेंशियल अवेअरनेस, जनरल इंग्लिंश क्वांटिटेटिव्ह एप्टिट्युड आणि रीनजनिंग एबिलिटी आणि कॉम्प्युटर अ‍ॅप्टिट्युड विषयांमधील एकूण १०० प्रश्न असतील. परीक्षेचा कालावधी एक तासाचा असेल. तसेच एकूण निर्धारित गुण १०० असतील. लेखी परीक्षेमध्ये ०.२५ गुणांचे निगेटिव्ह मार्किंग असेल. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना स्थानिक परीक्षेसाठी निमंत्रित केले जाईल.असाअसेल ट्रेनिंग कालावधी आणि स्टायपेंडएसबीआय अप्रेंटिस भरती २०२० निवड प्रक्रियेच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना संबंधित राज्य आणि जिल्ह्यातील ब्रँचमध्ये तैनात करण्यात येईल. अप्रेंटिसचा काळ तीन वर्षांचा असेल. अप्रेंटिसदरम्यान प्रशिक्षितांना पहिल्या वर्षी १५ हजार रुपये दरमहा स्टायपेंड मिळेल. दुसऱ्या वर्षी १६ हजार ५०० आणि तिसऱ्या वर्षी १९ हजार रुपये प्रतिमाह स्टायपेंड मिळेल.

नोटिफिकेशन लिंक...यावर क्लिक कराअर्ज भरण्यासाठी यावर क्लिक करा... 

टॅग्स :SBIएसबीआयState Bank of Indiaस्टेट बँक आॅफ इंडियाgovernment jobs updateसरकारी नोकरीBanking Sectorबँकिंग क्षेत्र