शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

८० हजार जणांना परवानगी, सत्संगाला आले अडीच लाख लोक: आयोजकांवर पुरावे दडविल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2024 08:24 IST

हाथरस चेंगराचेंगरीची न्यायालयीन चौकशी; घातपाताची शक्यता

राजेंद्र कुमारहाथरस : उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात सत्संग कार्यक्रमादरम्यान मंगळवारी दुपारी झालेल्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या १२१वर पोहोचली असून. त्या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. ही दुर्घटना घडविण्याचा कट आखण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही असेही ते म्हणाले.

सत्संगासाठी ८० हजार लोकांनाच परवानगी असताना प्रत्यक्षात अडीच लाख लोक तिथे आले होेते, अशी माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये नमूद केली आहे.  हाथरस जिल्ह्यातील फुलरई गावात नारायण साकार हरी ऊर्फ भोलेबाबांचा सत्संग होता. सत्संग झाल्यानंतर भोलेबाबा निघाले, तेव्हा त्यांच्या पायाखालची माती घेण्यास भाविक पुढे सरसावले. त्यावेळी चेंगराचेंगरी झाली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बुधवारी हाथरस येथे जखमींची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. अधिकाऱ्यांची बैठक घेऊन दुर्घटनेविषयी माहिती जाणून घेतली.

आयोजकांवर पुरावे दडविल्याचा आरोपहाथरस येथील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेतील बहुतांश मृत व्यक्तींची ओळख पटली असल्याचे उत्तर प्रदेश सरकारने म्हटले आहे. हा कार्यक्रम आयोजित करणाऱ्या आयोजकांविरोधात पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरमध्ये म्हटले की, सत्संगाला नेमके किती लोक आले, याचा खरा आकडा आयोजकांनी सांगितला नव्हता. अशा प्रकारे त्यांनी पुरावे दडविण्याचे काम केले. 

एफआयआरमध्ये भोलेबाबांचा उल्लेख नाहीचेंगराचेंगरीच्या दुर्घटनेला पोलिस किंवा स्थानिक प्रशासन जबाबदार नाही. मुख्य सेवादार देवप्रकाश मधुकर व आयोजकांपैकी आणखी काही जणांची नावे एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नोंदविण्यात आली आहेत. मात्र त्यात भोलेबाबांचा उल्लेख केलेला नाही.