शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विरोधीपक्षातील आमदारांचं कारकून सुद्धा ऐकत नाही; मनसेत असताना मी अनुभवलं - हर्षवर्धन जाधव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 12:20 IST

सत्ताधारी पक्षात असणे व विरोधात असणे यात खूप तफावत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत औरंगाबाद जिल्ह्यातील सहा मतदारसंघात उमेदवार  मैदानात उतरविणार असल्याचा निर्णय शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे प्रमुख व माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी नुकतेच जाहीर केला होता. पुन्हा युतीचे सरकार येऊ शकते. त्यामुळे आपण राष्ट्रवादी पक्षात जाण्याचे टाळले असून, विरोधीपक्षातील आमदारांना साधा कारकून सुद्धा ऐकत नाही. तर मनसेत असताना मी हे स्व:ता अनुभवलं असल्याचा दावा जाधव यांनी कार्यकर्त्या मेळाव्यात केला.

लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून जाधव यांनी २ लाख ८३ हजार मते घेतली. त्यांची ही मते ‘किंगमेकर’ठरली होती. तर विधानसभा निवडणुकीत सुद्धा आपण उतरणार असल्याचे त्यांनी आधीच स्पष्ट केले होते. मात्र जाधव हे राष्ट्रवादी पक्षात जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरु होती.  शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या पक्षाचे पर्याय समोर असताना सुद्धा कोणत्याही पक्षासोबत न जाता स्वतंत्र लढण्याचा निर्णय कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारांच्या संपर्कातून निर्णय घेतला असल्याचे  जाधव म्हणाले होते.

तसेच कोणत्याही पक्षासोबत न जाता, अपक्ष निवडणूक लढवण्याच्या निर्णय का घेतला याचा खुलासा जाधव यांनी गुरुवारी कन्नड येथे घेतलेल्या कार्यकर्त्या मेळाव्यात केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणांमुळे भाजप-शिवसेनेच्या बाजूची परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र असे असले तरीही भविष्यात युतीत बिघाडी निर्माण होणार असून, अशावेळी दोन्ही पक्षाचे नेते काही अपक्ष आमदार हाताशी लागतात का? याचा शोध घेतील. त्यामुळे अशा वेळी अपक्ष आमदार त्यांच्या बरोबर गेला तर मंत्रिमंडळात त्याची शंभर टक्के वर्णी लागणार.

तर विरोधीपक्षात असताना कुठलेही मदत नाही,कुठलेही बजेट नाही,निधी मिळत नाही. एवढचं नाही तर पोलिसांचा मारहाण करेपर्यंत त्रास मी सहन केला आहे. सत्ताधारी पक्षात असणे व विरोधात असणे यात खूप तफावत आहे. विरोधीपक्षात असलेल्या आमदारांना साधा कारकून सुद्धा ऐकत नाही ही परिस्थिती असून, मी स्व:ता मनसेत असताना हे अनुभवलं असल्याचे जाधव म्हणाले. त्यामुळे आपल्या मतदारसंघातील विकास कामे व्हावीत यासाठी मुख्यमंत्र्यांशी माझे संबध चांगले असायला पाहिजे, यासाठी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सुद्धा जाधव म्हणाले.