शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

ग्रामीण महाराष्ट्राच्या जिद्दीला सलाम

By admin | Updated: December 5, 2014 11:13 IST

चिखली तालुक्यातील दिवठाणा येथील कुशीवर्ता साळोख, लोणार तालुक्यातील हत्ता गावच्या सुवर्णा आटोळे आणि वाशिम तालुक्यातील सायखेड्याच्या संगीता आव्हाळे. त्यांनी दिलेला लढा कल्पनाही न केलेला.

त्या तिघींनी उलगडली संघर्षाची गाथा : शौचालयासाठी ठेवले दागिनेही गहाण‘लोकमत वुमेन समिट’ची आजची दुपार देश-विदेशातून येथे आलेल्या अनेकांसाठी काहीशी धक्कादायकच ठरली. व्यासपीठावर जातानाही संकोच करणा-या, माईकवर बोलताना बिचकणाऱ्या त्या तिघी. चिखली तालुक्यातील दिवठाणा येथील कुशीवर्ता साळोख, लोणार तालुक्यातील हत्ता गावच्या सुवर्णा आटोळे आणि वाशिम तालुक्यातील सायखेड्याच्या संगीता आव्हाळे. त्यांनी दिलेला लढा कल्पनाही न केलेला. ‘लोकमत’च्या फीचर एडिटर अपर्णा वेलणकर त्यांना बोलते करण्याचा प्रयत्न करत होत्या. ‘बोलायला काय घाबरायचं?’ या सवालातून निडरपणा दाखविताना कुशीवर्ता साळोख म्हणाल्या, ‘‘शाळेचं स्वच्छता अभियान सुरू झालं. दुसऱ्याची लेकरं येतात, हगणदारी स्वच्छ करतात, तिथं जाऊन घाण करणं मनाला पटंना. म्हणून ठरवलं संडास बांधायचा; पण परिस्थिती नव्हती. लग्नानंतर तीन वर्षांनी मालक वारले़ २ वर्षाच्या मुलीला घेऊन माहेरी आले़ भावाने आधार दिला़ १२ वर्षे राहिल्यावर स्वत:चं मातीचं घर बांधले; पण त्याच्याही दोन भिंती पडलेल्या. जवळ मोलमजुरी करून केलेली चांदी होती. पैशासाठी तीच गहाण ठेवली आणि संडास बांधून दाखवला. आता गावातल्या लोकांनाही त्याचं अप्रूप वाटायला लागलंय.’’महिलांच्या प्रश्नांवर चर्चा होत असताना ग्रामीण महाराष्ट्रातील शौचालयासारख्या सुविधेसाठीही महिलांना द्याव्या लागत असलेल्या लढ्याची कहाणी प्रत्यक्ष त्यांच्या तोंडून ऐकताना संपूर्ण सभागृह अवाक् होऊन गेले. त्या तिघींनी आपले दागिने विकून शौचालय उभारलेच. त्यांच्या कृतीचा आदर्श घेत अनेक गावांत चळवळ सुरू झाली. या जिद्दीला मान्यवरांनी सलाम केला. लोकमत मीडिया प्रा. लि.चे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी प्रत्येकी ११ हजार रुपये देऊन त्यांचा सत्कार केला. ------------लग्नाला १२ वर्षे झाली. तेव्हापासून ‘त्यांना’ म्हणत होते; पण परिस्थितीमुळे त्यांच्याकडूनही टाळाटाळ होत होती. मुलगी ११ वर्षांची झालीय. शौचालय नसल्याने आपल्या वाट्याला जे आलं, ते तिच्या वाट्याला येऊ नये म्हणून या वर्षी संडास बांधायचाच ठरवला. मोलमजुरी करून पैसेही गोळा केले. शेवटी मिस्त्रीची मजुरी द्यायला शिल्लक नव्हती. मग मंगळसूत्रच विकलं; पण संडास बांधलंच. सौभाग्याचं लेणं विकलं म्हणणाऱ्यांना उत्तर दिलं, की ५ हजारांची साडी अन् दोनपदरी डोरली घातली तरी संडास नसल्याने डबा घेऊन जाता, तर तुमची पत शून्य आहे.’’ - संगीता आव्हाळे, स्वच्छतादूत, अमरावती जिल्हा ------------कुशीवर्ताबार्इंच्या शहरी महिलांना टिप्स‘बसून राह्यलं की व्यायाम होत नाही’ असे सांगत कुशीवर्ताबार्इंनी शहरी महिलांच्या डोळ्यांत अंजनच घातले. ‘वुमेन समिट’मध्ये दिवसभर गप्पा मारता? काम कधी करता? असा निरागस प्रश्नही त्यांनी विचारला. ‘छातीचं आॅपरेशन झाल्यावरही विहिरीत उतरून पहारीने खोदाई केल्याचेही त्यांनी सांगितले. ‘डिश’ भरून खाऊनही पोट भरत नाही, भाजी-भाकरी आपली बरी, असे सांगत त्यांनी एखाद्या ‘डायटेशियन’च्या टिप्सच महिलांना दिल्या. -------------बाहेर गेले आणि माणसं आली की उठावे लागे़ घरची परिस्थिती नव्हती़ तेव्हा मंगळसूत्र विकलं़ शौचालय बांधलं़ गावातील घरोघरी जाऊन शौचालय बांधण्याचा बायकांना आग्रह केला़ आता संपूर्ण गाव हगणदारीमुक्त झालं आहे़ घरात केवळ शौचालय असणे महत्त्वाचे नाही; ते वापरणंही महत्त्वाचं आहे़  - सुवर्णा आटोळे-------------लोकमतच्या फिचर एडीटर अपर्णा वेलणकर या महिलांच्या जिद्दीची कहानी सांगितली. त्या म्हणाल्या, ‘अडखळत बोलत असलेल्या या महिलांनी त्यांच्या परिसरात क्रांती केली आहे. नवीन चळवळीला त्यांच्या कामातून सुरू झाली आहे.’