शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
6
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
7
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
8
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
9
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
10
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
11
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
12
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
13
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
14
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
15
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
16
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
17
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
18
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
19
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
20
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?

हरित महाराष्ट्र अभियानाला पावसाचा खोडा!

By admin | Updated: July 7, 2015 00:00 IST

वृक्षरोपणाला अल्प प्रतिसाद; वनाच्छादनाखालील जमीन वाढविण्यासाठी प्रयत्न.

हर्षनंदन वाघ / बुलडाणा : महाराष्ट्र राज्यात वनाच्छादनाखालील क्षेत्र वाढविण्याच्या हेतूने वनांमधील रोपांच्या नैसर्गिक पुनर्निर्मितीवर भर देण्यासाठी हरित महाराष्ट्र अभियान श्रमदानातून राबविण्यात येत आहे. यासाठी १ ते १५ जुलै दरम्यान विशेष सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे; मात्र पावसाने दडी दिल्याने या सप्ताहात आयोजित विविध उपक्रमांना अल्प प्रतिसाद मिळत आहे. राज्यात ३३ टक्के भूभाग वनाच्छादनाखाली असणे आवश्यक असताना हे क्षेत्र केवळ १६ टक्के एवढे आहे. त्यातही चांगले आणि मध्यम दर्जाचे वनाच्छादन फक्त ९.६ टक्क्य़ांपर्यंत र्मयादित आहे. ३३ टक्क्यांपर्यंत वनाच्छादनाचे राष्ट्रीय उद्दिष्ट गाठण्यासाठी राज्यात हरित महाराष्ट्र अभियान राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत महापालिका, नगरपरिषद आदींच्या सहकार्याने रस्ते, गावठाण, गावातील मोकळ्या जागा, गावातील शाळेचा परिसर, बाजापेठ, प्रार्थनास्थळे, स्मशानभूमी आदी परिसरात वृक्षारोपण करण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येणार होते; मात्र पाऊस नसल्यामुळे या अभियानाकडे दुर्लक्ष दिसून येत आहे.

*वृक्षारोपणाला अल्प प्रतिसाद

        या अभियानातंर्गंत झाडे स्वस्त दरात विक्री, वितरण करण्याकरिता शहर, गावांच्या अनेक भागात वाहनाद्वारे फिरती विक्री करण्याचे सुचवण्यात आले आहे. याशिवाय रोप विकत घेणार्‍यांना पुढील वर्षी कुठल्या वृक्षप्रजाती किती संख्येत लागतील, याची मागणी व नागरिकांचा अभिप्रायही नोंदविला जाणार होता; मात्र पाऊस नसल्यामुळे रोपे घेणार्‍यांची व वृक्षारोपण करणार्‍यांची संख्या अल्प असल्याचे दिसून येत आहे.