शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

हरिश्चंद्र माधव बिराजदार स्मृतिदिन

By admin | Updated: September 14, 2016 10:20 IST

हरिश्चंद्र माधव बिराजदार हे पहिलवानी कुस्ती खेळणारे मराठी कुस्तीगीर व कुस्ती-प्रशिक्षक होते.

प्रफुल्ल गायकवाड, ऑनलाइन लोकमत 
 
(५ जून, इ.स. १९५० : १४ सप्टेंबर, इ.स. २०११) 
हरिश्चंद्र माधव बिराजदार हे पहिलवानी कुस्ती खेळणारे मराठी कुस्तीगीर व कुस्ती-प्रशिक्षक होते. स्कॉटलंड येथे झालेल्या इ.स. १९७० सालातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते, तर इ.स. १९७२ साली त्यांनी भारतातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अजिंक्यपद जिंकून रुस्तम-ए-हिंद किताब मिळवला होता. खेळाडू म्हणून कारकिर्द संपल्यावर ते कुस्ती-प्रशिक्षक म्हणून काम करत होते. पुण्यातील गोकुळ वस्ताद तालमीत ते कुस्ती शिकवत असत.
 
जीवन
५ जून, इ.स. १९५० रोजी महाराष्ट्राच्या वर्तमान लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात रामलिंग मुदगड या गावी ह‍रिश्चंद्र बिराजदारांचा जन्म झाला. त्यांचे वडील पहिलवान होते. हरिश्चंद्रांच्या वयाच्या पाचव्या वर्षी त्यांची आई निवर्तली. वडिलांनी कुस्ती खेळण्यातले हरिश्चंद्रांच्या अंगचे गुण हेरून त्यांना इ.स. १९६५च्या सुमारास तालीम करण्यासाठी कोल्हापुरास गंगावेस तालमीत धाडले. इ.स. १९६९ मध्ये दादू चौगुले याला हरवत त्यांनी महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्याच वर्षी कानपूर येथे झालेल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत त्यांनी हिंदकेसरी किताबही जिंकला. स्कॉटलंडातील एडिंबरा येथे झालेल्या इ.स. १९७० सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी कुस्तीतले सुवर्णपदक जिंकले. इ.स. १९७२ साली वाराणसीयेथे झालेल्या भारतातल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत त्यांनी नेत्रपाल नावाच्या दिल्लीच्या कुस्तीगिराला हरवत रुस्तम-ए-हिंद किताब पटकावला. इ.स. १९७७ साली बेळगाव येथे झालेल्या मैदानी कुस्तीच्या मुकाबल्यात त्यांनी दिल्लीच्या बिर्ला आखाड्याच्या सत्पाल मल्लास हरवण्याचे आव्हान जिंकले.
 
पुरस्कार
२००६ - मेजर ध्यानचंद पुरस्कार
१९७१ - शिवछत्रपती पुरस्कार
१९९८-९९ - दादोजी कोंडदेव पुरस्कार
२००० - राष्ट्रीय विशेष पुरस्कार
११९४ - जागतिक मराठी परिषद
 
कारकिर्दीतील महत्त्वाचे टप्पे
१९७२ मध्ये म्यूनिच येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभाग
१९७० मध्ये एडमंटन, कॅनडा येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत सहभाग
१९७० मध्ये एडिंवरो, स्कॉटलंड येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले
१९७२ मध्ये वाराणसी येथे झालेल्या रुस्तम-ए-हिंद राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत रूस्तम-ए-हिंद हा किताब पटकाविला
१९७७ मध्ये बेळगाव येथे झालेल्या मैदानी कुस्ती स्पर्धेत सत्पाल सिंगवर विजय मिळविला
१९७३ मध्ये मुंबईत झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले
१९६९ मध्ये हिंद केसरी कुस्ती स्पर्धेत सुवर्णपदक आणि १९६८ मध्ये हिंद केसरी स्पर्धेत रौप्यपदक
१९६९ मध्ये लातूर येथे झालेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब