शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्या मोदी मुंबईत तर दिल्लीत ठरणार शिंदेंचं भवितव्य; सुप्रीम कोर्टात अंतिम सुनावणी, शिवसेना कुणाची?
2
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
3
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
4
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
5
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
6
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
7
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
8
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...
9
जबरदस्त फिचर! नंबरशिवाय तुमचे WhatsApp काम करेल, लवकरच अपडेट होणार
10
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
11
सगळ्याच मर्यादा ओलांडल्या! १८ वर्षांच्या जावयाशी लग्न करणार होती सासू; मंगळसूत्र घालण्याआधीच मुलीची एंट्री झाली अन्.. 
12
‘मविआ’सोबत न घेण्याच्या हर्षवर्धन सपकाळांचा निर्णय, मनसेची पहिली प्रतिक्रिया; नेते म्हणाले...
13
चालत्या कारच्या छतावर जोडप्याचे खुल्लम खुल्ला प्रेम, व्हिडिओ व्हायरल झाल्याने लोकांमध्ये संतापाची लाट
14
आज नवान्न पौर्णिमा: अन्नपूर्णेच्या कृपेने धन-संपत्तीप्राप्तीसाठी आज 'हा' विधी चुकवू नका!
15
Lifelesson: प्रेमानंद महाराजांच्या 'या' ३ सूचना, तुमच्या मनाला उभारी देतील हे नक्की!
16
"धर्मांतरणासाठी सुरू होती परदेशी फंडिंग...", छांगूर बाबाविरोधातील चार्जशीटमध्ये ATS चे मोठे दावे!
17
Cough Syrup : भयंकर! कफ सिरपमध्ये शाई, पेंटमधील केमिकलचा वापर? मुलांच्या औषधामागचं 'विषारी' सत्य
18
GST कपातीनंतर ₹८ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये येतील अनेक भारी कार्स, खरेदीचा विचार करत असाल तर पाहा यादी
19
अमेरिकेला बंदर, कराचीमध्ये तुर्कीला जमीन; पाकिस्तानच्या नवीन युतीमुळे भारतासमोर आव्हान
20
दिल्लीचा प्रसिद्ध लाल किल्ला होत चालला आहे काळा! शास्त्रज्ञांनी सांगितले कारण; म्हणाले...

स्मार्ट सिटीपेक्षा आनंदी शहरे आवश्यक

By admin | Updated: May 7, 2017 04:25 IST

‘देशात शंभर स्मार्ट सिटी निर्माण करण्यापेक्षा आनंदी शहरे निर्माण करायला हवीत. स्मार्ट सिटीमध्ये मोठ्या कंपन्या त्यांना हवे ते

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : ‘देशात शंभर स्मार्ट सिटी निर्माण करण्यापेक्षा आनंदी शहरे निर्माण करायला हवीत. स्मार्ट सिटीमध्ये मोठ्या कंपन्या त्यांना हवे ते करतील. यामध्ये सर्वसामान्य नागरिकांची मते कुणीच विचारणार नाही. त्यांच्या हातात तुमचा ‘आत्मा’ द्यायचा की नाही, ही तुमची निवड आहे,’ अशा शब्दांत जागतिक कीर्तीचे तंत्रज्ञ-संशोधक डॉ. सॅम पित्रोदा यांनी स्मार्ट सिटी योजनेवर टीका केली. पुणे इंटरनॅशनल सेंटरच्या वतीने ‘इंटरनेट अँड फ्युचर वर्ल्ड आॅर्डर’ या विषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. फाईव्ह एफ वर्ल्डचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष डॉ. गणेश नटराजन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. सेंटरचे उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर, मानद संचालक प्रशांत गिरबने आदी या वेळी उपस्थित होते.इंटरनेट, तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे बेरोजगारीचे प्रमाणही वाढणार आहे; पण त्याला आपण रोखू शकत नाही. उलट, त्यादृष्टीने प्रत्येकाने सज्ज राहायला हवे. या बदलांचा स्वीकार करीत स्वत:मध्ये बदल करणे आवश्यक आहे. इतकी वर्षे होऊनही भारताचे स्वत:चे सर्च इंजिन नाही.’’ कोट्यवधी लोक फेसबुक, टिष्ट्वटरचा वापर करीत आहेत; पण त्याचे सर्व्हर दुसऱ्या देशात आहे. हे अत्यंत लाजिरवाणे आहे, अशी खंतही डॉ. पित्रोदा यांनी व्यक्त केली. इंटरनेटचा वाढलेला वापर विस्मयकारकडॉ. पित्रोदा म्हणाले, ‘‘आज जगभरात इंटरनेटचा वाढलेला वापर हा विस्मयकारक असून गेल्या अनेक दशकांत झालेला या क्षेत्राचा विस्तार महत्त्वाचा आहे. हा विस्तार लक्षात घेत इंटरनेटद्वारे केवळ भारतीयच जगभरात बदल घडवू शकतात. मात्र, असे असले तरी स्वत:ची क्षमता ओळखण्यासाठी आपण असमर्थ आहेत. आज दैनंदिन जीवनाशी निगडित जवळजवळ प्रत्येक गोष्टीशी इंटरनेट जोडले गेले आहे. काही वर्षांआधी अमेरिका हा याच तंत्रज्ञानामुळे विकसित देश समजला जायचा; मात्र आता परिस्थिती बदलली आहे. भारतातही इंटरनेटचा झालेला प्रसार हा वाखाणण्याजोगा आहे. आपल्याकडे आज असलेली लोकसंख्या आणि साधने यांचा विचार केला, तर इंटरनेट क्षेत्रात आपण भारतीयच बदल घडवून आणू शकतो, असा विश्वास आहे. मात्र, हे होत असताना या क्षेत्रात नवीन मॉडेल आणणे गरजेचे असून ते आणण्याची क्षमता असूनदेखील ती कृती करण्यासाठी आपण असमर्थ आहोत, हेही आपल्याला जाणून घ्यायला हवे.’’