शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

"अनुसूचित जातीची असल्याने मला रात्रभर पाणीही दिलं नाही", नवनीत राणा यांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2022 15:04 IST

Navneet and Ravi Rana: खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून, पोलीस स्टेशनमध्ये मिळालेल्या वागणुकीची माहिती दिली आहे.

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या घरासमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आव्हान करत, सामाजिक तेढ निर्माण करणारे विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याला वांद्रे न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र लिहून तुरुंगात मिळालेल्या वागणुकीबद्दल गंभीर आरोप केले आहेत. 

'रात्रभर पाणी दिले नाही'नवनीत राणा यांनी बिर्ला यांना लिहीलेल्या पत्रात अनेक धक्कादायक आरोप केले आहेत. त्यांनी लिहिले की, "मला 23 एप्रिल 2022 रोजी खार पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. मी संपूर्ण रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढली. मी पिण्यासाठी पाणी मागितले, पण मला रात्रभर पाणीही दिले नाही. पाणी मागितल्यामुळे मला जातीवाचक शिवीगाळ केली. मी अनुसूचित जातीची आहे, यामुळे मला पाणी पिण्यासारखा मूलभूत हक्कही नाकारण्यात आला." 

'आम्ही निर्ण मागे घेतला पण...'त्या पुढे लिहीतात की, "मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही हनुमान चालीसा पठण करण्यासाठी आमंत्रित केले होते. माझा हा उपक्रम मुख्यमंत्र्यांच्या विरोधात नव्हता. पण, मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा विचार करुन आम्ही हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय मागे घेतला आणि मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाणार नसल्याचे सांगितले. पण, त्यानंतरही मला आणि माझ्या पतीला घरात कैद केले."

'उद्धव ठाकरेंनी जनादेशाचा अपमान केला'"उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने सार्वजनिक जनादेशाचा अपमान करून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत युती केली. यावरुन ते हिंदुत्वापासून पूर्णपणे विचलित झाल्याचे दिसत आहे. शिवसेनेत हिंदुत्वाची ज्योत पुन्हा प्रज्वलित करण्याच्या आशेने आम्ही मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याची घोषणा केली होती. कोणत्याही प्रकारचा धार्मिक तणाव निर्माण करण्याचा आमचा हेतू नव्हता," असेही राणा यांनी पत्रात म्हटले आहे.

टॅग्स :navneet kaur ranaनवनीत कौर राणाRavi Ranaरवी राणाom birlaओम बिर्ला