शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

राज्यातील अर्धे स्वाईन फ्लूचे रुग्ण नागपुरात

By admin | Updated: February 10, 2015 00:06 IST

स्वाईन फ्लूने राज्यात आतापर्यंत ३८ रुग्णांचा मृत्यू झाला असून १९३ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ५८ टक्के रुग्ण एकट्या नागपुरातील आहेत. स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी

पालकमंत्र्यांनी घेतली स्वाईन फ्लूवर बैठक नागपूर : स्वाईन फ्लूने राज्यात आतापर्यंत ३८ रुग्णांचा मृत्यू झाला असून १९३ पॉझिटिव्ह आले आहेत. यातील ५८ टक्के रुग्ण एकट्या नागपुरातील आहेत. स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. सोबतच मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डाच्या खाटा ३० वरून वाढवून ४५ करण्याचा व जनजागृतीसाठी पाच लाख पत्रके वितरित करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.स्वाईन फ्लू नियंत्रणात आणण्यासाठी सोमवारी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला विभागीय आयुक्त अनुप कुमार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे, सार्वजनिक आरोग्य विभागाचे संचालक डॉ. सतीश पवार, जिल्हाधिकारी अभिषेक कृष्णा, आमदार डॉ. मिलिंद माने, महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित होते. पालकमंत्री बावनकुळे म्हणाले, नागपूर विभागात स्वाईन फ्लूचे १९ बळी झाले असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९१ झाली आहे. स्वाईन फ्लू रुग्णाची निश्चित आकडेवारी मिळण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांकडे नोडल अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आहे. यामुळे रोज मेडिकल, मेयोसह, महानगरपालिका, आरोग्य विभागाची इस्पितळे व खासगी इस्पितळे नोडल अधिकाऱ्याला सायंकाळी ५ वाजतापूर्वी रिपोर्टिंग करतील. नोडल अधिकारी हा रोजचा अहवाल एकत्र करून तो पालकमंत्री ते विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त व महापौरांना सादर करेल. (प्रतिनिधी)जनजागृतीसाठी पाच लाख पत्रकांचे वितरणपालकमंत्री म्हणाले, थंडी लांबल्याने व जनजागृतीअभावी स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णासोबतच त्याच्या नातेवाईकांनी आणि सामान्य नागरिकांनी घ्यावयाची काळजी व उपाययोजनांची माहिती देणारी पाच लाख पत्रके लवकरच वितरित करण्यात येणार आहे. संशयित रुग्णाच्या मदतीसाठी काही फोननंबरही यात देण्यात आले आहेत.स्वाईन फ्लू वॉर्डाच्या खाटा ४५ होणारमेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात ३० खाटा आहेत. त्या वाढवून ४५ करण्यात येतील. पुढील वर्षात यात १५ खाटा वाढवून ६० करण्यात येणार आहेत. या वॉर्डाच्या बांधकामासाठी जिल्हा नियोजन समितीकडून दोन कोटी रुपये उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याचे पालकमंत्री यांनी सांगितले.