शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हज कमिटीला १५ हजार जागांचा जादा कोटा, महाराष्ट्राला सर्वाधिक २३८७ जागा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2019 06:22 IST

या वर्षी हज यात्रेसाठी जाण्यास इच्छुक असूनही हज कमिटी ऑफ इंडियाने काढलेल्या सोडतीत नंबर न लागलेल्या नागरिकांसाठी खूशखबर आहे.

जमीर काझीमुंबई : या वर्षी हज यात्रेसाठी जाण्यास इच्छुक असूनही हज कमिटी ऑफ इंडियाने काढलेल्या सोडतीत नंबर न लागलेल्या नागरिकांसाठी खूशखबर आहे. हज समितीचा कोटा तब्बल १४ हजार ९७५ जागांनी वाढविण्यात आला आहे. यातील सर्वाधिक २,३८७ जागा महाराष्ट्राच्या वाट्याला आल्या आहेत. सौदी अरेबिया सरकारशी झालेल्या करारानुसार सौदी दूतावासाकडून ही वाढ करण्यात आली आहे. प्रतीक्षा यादीवर प्राधान्यक्रमानुसार अर्जदारांची निवड केली असून संबंधितांनी ९ मेपर्यंत सर्व कागदपत्रे सादर करायची आहेत. वाढलेल्या जागांमुळे या वर्षी हज कमिटीकडून एकूण १ लाख ४० हजार यात्रेकरूंना हजला जाता येईल.

इस्लाम धर्मातील प्रमुख पाच तत्त्वांपैकी हज यात्रा एक असून ती दरवर्र्षी सौदी अरेबियात होते. जगभरातील मुस्लीम बांधव यात्रेत लाखोंच्या संख्येने सहभागी होतात. भारतातील यात्रेकरूंसाठी केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्रालयाकडून नियोजन होते. भारतासाठी सरासरी १ लाख ६० हजार यात्रेकरूंना पाठविले जाते. यात जवळपास ५० हजार जागा खासगी टुर्स कंपनीला दिल्या असून उर्वरित यात्रेकरूंच्या यात्रेचे नियोजन हज कमिटी ऑफ इंडियाकडून होते. या वर्षी सप्टेंबरमध्ये होणाऱ्या यात्रेसाठी हज कमिटीसाठी सुरुवातीला १ लाख २५ हजार जागा देशभरातील विविध राज्यांतून आलेल्या अर्जांतून संगणकीय सोडत काढून निश्चित करण्यात आल्या. याशिवाय हज कमिटीने आणखी कोटा वाढवून देण्याची मागणी जानेवारीत मंत्रालयामार्फत केली होती. त्यानंतर आता सौदी अरेबियाच्या जेदाद्द दूतावासाने १८ एप्रिलला १४ हजार ९७५ जागांचा अतिरिक्त कोटा बहाल केला आहे.

अतिरिक्त कोट्याचे विविध १४ राज्यांतील इच्छुकांच्या प्रमाणानुसार वाटप करण्यात आले असून यामध्ये महाराष्ट्रातील रहिवाशांना सर्वाधिक २,३८७ जागा देण्यात आल्या आहेत. त्यानुसार प्रतीक्षा यादीवर असलेल्या ७२१ ते ३,१०४ क्रमांकावर असलेल्यांना हजला जाण्याची संधी मिळणार आहे.

अतिरिक्त कोट्यातील राज्यनिहाय जागाअतिरिक्त कोट्यातील महाराष्ट्र (२,३८७)व्यतिरिक्त अन्य प्रमुख राज्यांना देण्यात आलेल्या जागा अशा- उत्तर प्रदेश (२,१५४), केरळ (१,६३२), जम्मू-काश्मीर (१,५७६), कर्नाटक (१,४५२), राजस्थान (१,१४३), गुजरात (१,०७५), मध्य प्रदेश (८७८), तेलंगणा (८२१)

प्रतीक्षा यादीवरील इच्छुकांना संधीसौदी दूतावासाशी झालेल्या पत्रव्यवहारानुसार हज कमिटीला १४,९७५ अतिरिक्त कोटा मिळाला आहे. या जागांवर राज्यनिहाय प्रतीक्षा यादीवरील इच्छुकांना संधी देण्यात आलेली असून पात्र ठरलेल्यांनी वेळेत कागदपत्रे व रकमेची पूर्तता केल्यानंतर त्यांचा प्रवास निश्चित समजला जाईल. - डॉ. एम. ए. खान, मुख्य कार्यकारी अधिकारी, हज कमिटी ऑफ इंडिया

टॅग्स :Haj yatraहज यात्राMaharashtraमहाराष्ट्र