शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनानंतर राज्यावर गारपीटीचे संकट, 'या' जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 06:32 IST

२८ डिसेंबर रोजी पश्चिम मध्य प्रदेश व मराठवाड्यातही अवकाळीची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.

मुंबई : पश्चिमी प्रकोप (वेस्टर्न डिस्टर्बन्स) पूर्व अफगाणिस्तान व लगतच्या पाकिस्तानवर आहे. तेथून राजस्थानच्या हवेतील सिस्टीममधून विदर्भापर्यंत ते कार्यरत राहील. त्याचा प्रभाव म्हणून २८ ते २९ डिसेंबर रोजी मराठवाडा व विदर्भात कडकडाटासह काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. २८ आणि २९ डिसेंबर रोजी पूर्व मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगडमध्ये तुरळक ठिकाणी गारपीटची शक्यता आहे. २८ डिसेंबर रोजी पश्चिम मध्य प्रदेश व मराठवाड्यातही अवकाळीची शक्यता हवामान शास्त्र विभागाने वर्तविली आहे.

- विदर्भात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. कोकण, गोव्याच्या काही भागात किमान तापमानात किमान तापमानात किंचित घट झाली आहे. उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले आहे. तर राज्यात सर्वात कमी किमान तापमान जळगाव येथे ११.७ अंश सेल्सिअस एवढे नोंद झाले आहे.

येथे पावसाची शक्यता२८ डिसेंबर रोजी औरंगाबाद, जालना, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया आणि २९ डिसेंबर रोजी चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे पावसाची शक्यता आहे. याव्यतिरिक्त धुळे, नाशिक, जळगाव, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर या जिल्ह्यांसाठी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. - कृष्णानंद होसाळीकर, वरिष्ठ शास्त्रज्ञ, भारतीय हवामान शास्त्र विभाग 

टॅग्स :Rainपाऊस