शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

एच वेस्ट वॉर्ड : सेलिब्रटींच्या वॉर्डात कॉंग्रेससमोर भाजपाचे आव्हान

By admin | Updated: December 29, 2016 14:50 IST

मुंबईतील सेलिब्रेटी वॉर्ड म्हणून एच वेस्टची ओळख आहे. मायानगरी मुंबईच्या चंदेरी दुनियेतील अनेक सेलिबे्रटींचे या भागात वास्तव्य आहे.

- गौरीशंकर घाळे मुंबई : मुंबईतील सेलिब्रेटी वॉर्ड म्हणून एच वेस्टची ओळख आहे. मायानगरी मुंबईच्या चंदेरी दुनियेतील अनेक सेलिबे्रटींचे या भागात वास्तव्य आहे. यापेक्षा महत्वाची आणि मोठी ओळख म्हणजे या वॉर्डातील स्वयंसेवी संस्थाचे जाळे. नागरी समस्यांपासून प्रत्येक बाबतीत या सजग स्वयंसेवी संस्थांची नजर असते. त्यामुळे प्रशासन आणि राजकारण्यांनाही या संस्थांशी जुळवून घेतच आपाल गाडा हाकावा लागतो. मागील पालिका निवडणुकीत या वॉर्डातील सहा पैकी चार जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले होते तर शिवसेना आणि भाजपाकडे प्रत्येकी एक जागा आली होती. मात्र, लोकसभेपाठोपाठ विधानसभेतही नरेंद्र मोदींच्या लाटेने सर्वच राजकीय समीकरणे बदलून गेली आहेत. पाली हिल, वांद्रे रेक्लेमेशन अशी श्रीमंत वस्ती तर खारदांडा, खिरानगर येथील सामान्य वर्गाच्या चाळी असा वर्ग या वॉर्डात आढळून येतो. दिवंगत काँग्रेस नेते सुनिल दत्त यांच्यामुळे श्रीमंत-अतिश्रीमंत वर्गाचा आणि मुस्लिम मतदारांचा ओढा कायम काँग्रेसकडे राहीला. त्यांची कन्या आणि माजी खासदार प्रिया दत्त यांनीही मागील निवडणुकीपर्यंत या वर्गाला काँग्रेसकडे ठेवण्यात यश मिळविले होते. लोकसभा निवडणुकीनंतर मात्र सारेच चित्र बदलून गेले. नवमतदारांचा वाढीव टक्कयाने भाजपाला साथ दिली होती. भाजपाची विकासाची भाषा, योजना यामुळे भाजपाकडे गेलेला हा मतदार महापालिका निवडणुकीतही कोणती भूमिका घेतो यावर काँग्रेसचे भवितव्य ठरणार आहे. भाजपाच्या स्थानिक नेतृत्वानेही जाणीवपूर्वक स्वयंसेवी संस्था आणि त्यांच्या कार्यशैलीशी पूरक भूमिका घेत वाटचाल सुरु केली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत येथील ख्रिश्चन मतदार, श्रीमंत वर्ग भाजपाच्या दिशेने सरकत असल्याचे चिन्ह आहे. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीत काँग्रेससमोर भाजपाचे मोठे आव्हान असणार आहे. भाजपाच्या आक्रमक राजकारणाला रोखण्यासाठी राज्य अथवा विभागीय स्तरावर कोणतीच व्यवस्था सध्या दिसत नाही. त्यामुळे काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनाच आपापला मतदार राखावा लागणार आहे. अन्यथा काँग्रेसी पंजा कमळाच्या धक्कासमोर कितपट टीकाव धरेल, ही शंकाच आहे. शिवसेनेचा एक नगरसेवक निवडून आला असला आणि एका जागी दुस-या क्रमांकाची मते असली तरी या वॉर्डातील मुख्य लढत भाजपा विरुद्ध काँग्रेस अशी असणार आहे. अनधिकृत फेरीवाले आणि झोपडपट्टी अनधिकृत फेरीवाले आणि झोपडपट्टया हा विषय मुंबईतील सर्वच वॉर्डांमधील डोकेदुखी आहे. मात्र, एच वेस्टमधील नागरिकांचा रेट्यामुळे अशा प्रशासनालाही कारवाईचा बडगा उगारणे आवश्यक बनून जाते. या कारवाईस अडथळा निर्माण केल्यास राजकीय किंमत मोजावी लागण्याच्या भीतीने स्थानिक राजकारणीही माघार घेतात. अरुंद रस्ते आणि वाहतूक कोंडीअरुंद अंतर्गत रस्ते आणि वाहनांची मोठी गर्दी, यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळते. शिवाय लिंकीग रोड, पाली हिल वगैरे भाग आकर्षणाची केंद्र असल्याने होणा-या गर्दीमुळेही अनेकदा वाहतूक व्यवस्थेवर ताण जाणवतो. कचरा वर्गीकरणएच वेस्ट वॉर्डातून दररोज सुमारे ३५० मेट्रीक टन कचरा जमा होतो. कचरा वर्गीकरण आणि प्रक्रीयेचा महत्वाकांक्षी प्रकल्प या वॉर्डाने हाती घेतला आहे. नागरिकांनी घरातच कच-याचे वर्गीकरण करावे आणि पालिकेच्या तीन-चाकी सायकलींद्वारे हा वेगळा केलेला कचरा गोळा करण्याचे काम हात घेण्यात आले. मात्र, लोकांच्या वर्षानुवर्षांच्या सवयीमुळे अद्याप या मोहिमेला म्हणावे तसे यश आले नाही.पब झोनउशिरा पर्यत चालणारे पब आणि रेस्टोबारमुळे वांद्रयातील अनेक स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत. पब-बारबाहेरची गर्दी, गोंगाट आणि वादावादी यामुळे आजूबाजूच्या रहिवाशांची झोपमोड ठरलेली. यावर उपाय म्हणून या भागात खास पब झोन निर्माण करण्याची योजना पुढे आले. याबाबतचा प्रस्ताव सादर झाला असला तरी अंतिम निर्णय, अंमलबजावणी बाकी आहे. ------------------------------------खिरा नगर, मुक्तानंद पार्क, नवयुग कॉलनी, एमएसइबी कॉलनी, सांताक्रुझ बस डेपो, वेलिंग्टन जिमखाना, डॉ. आ.बेडकर नगर, खार जिमखाना, रोटरी पार्क, खारदांडा, दांडा व्हिलेज, गोविंद नगर, कोळीवाडा, पाली व्हिलेज, पटवर्धन पार्क, युनियन पार्क, पाली हिल, बांद्रा तलाव, नॅशनल लायब्ररी, चिंबई व्हिलेज, डॉ. भाभा हॉस्पिटल, संतोष नगर, बांद्रा रेक्लेमेशन, बांद्रा बस डेपो, ओएनजीसी कॉलनी आदी भागाचा या वॉर्डात समावेश होतो.नवीन रचना९७ खुला९८ खुला९९ अनुसूचित जमाती१०० इतर मागासवर्गीय१०१ खुला१०२ खुला महिलाप्रभाग क्रमांक ९७ आरक्षण - खुला एकूण लोकसंख्या - ५४२२५अनुसूचित जाती - १८८४ अनुसूचित जमाती - ७१५ प्रभागाची व्याप्ती - खिरा नगर, मुक्तानंद पार्क, नवयुग कॉलनी, एमएसइबी कॉलनी, सांताक्रुझ बस डेपोप्रभाग क्रमांक ९८आरक्षण - खुलाएकूण लोकसंख्या - ५७६८०अनुसूचित जाती - ४१५२अनुसूचित जमाती - २१३प्रभागाची व्याप्ती - वेलिंग्टन जिमखाना, डॉ. आ.बेडकर नगर, खार जिमखाना, रोटरी पार्कप्रभाग क्रमांक ९९आरक्षण - अनुसूचित जमातीएकूण लोकसंख्या - ५३६१५अनुसूचित जाती - १७९०अनुसूचित जमाती - १९६५प्रभागाची व्याप्ती - खारदांडा, दांडा व्हिलेज, गोविंद नगर, कोळीवाडाप्रभाग क्रमांक १००आरक्षण - इतर मागासवर्गीयएकूण लोकसंख्या - ५३०००अनुसूचित जाती - १७०७अनुसूचित जमाती -१३८प्रभागाची व्याप्ती - पाली व्हिलेज, पटवर्धन पार्क, युनियन पार्क, पाली हिलप्रभाग क्रमांक १०१आरक्षण - खुलाएकूण लोकसंख्या - ५५४९८अनुसूचित जाती - ४२३अनुसूचित जमाती - १७१प्रभागाची व्याप्ती - बांद्रा तलाव, नॅशनल लायब्ररी, चिंबई व्हिलेज, डॉ. भाभा हॉस्पिटलप्रभाग क्रमांक १०२आरक्षण - इतर मागासवर्गएकूण लोकसंख्या - ५५४७०अनुसूचित जाती - ८१०अनुसूचित जमाती - १२१प्रभागाची व्याप्ती - संतोष नगर, बांद्रा रेक्लेमेशन, बांद्रा बस डेपो, ओएनजीसी कॉलनी. २०१२ च्या निवडणुकीतील विजयी आणि पराभूत उमेदवारप्रभागविजयी उमेदवारमतेपराभूत उमेदवारमते९२गीता चव्हाण, शिवसेना ७२५७सीमा तिरोडकर, अपक्ष ६६०३९३अलका केरकर, भाजपा ९९२२मेहक बच्छानी, काँग्रेस ७४१०९४सुनिता वावेकर, काँग्रेस ७४९५लक्ष्मी पिंगे, शिवसेना ५८८२९५असिफ झकेरिया, काँग्रेस ७९५४अजित मन्याल, भाजपा ६०३३९६कॅरेल डिमेलो, काँग्रेस १०७६५अश्विनी रसाळ. भाजपा ७०१६९७तन्वीर अली पटेल, काँग्रेस ९३२४निलिमा ठाकूर, अपक्ष ३४०३