शहरं
Join us  
Trending Stories
1
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
2
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
3
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
4
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
5
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
6
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
7
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
8
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
9
पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त; जे घडले ते वाईटच : आव्हाड
10
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 
11
ऑटो ट्रान्सलेशनमुळे गोंधळ!; ‘मेटा’च्या अनुवाद तंत्राने मुख्यमंत्री सिद्धरामय्यांनाच ठरवले ‘मृत’
12
माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलाला मद्य घोटाळ्यात ईडीची अटक; छत्तीसगडमध्ये चैतन्य बघेल यांना कोठडी
13
आव्हाड घुसले पोलिस कारखाली, ओढून काढावे लागले बाहेर
14
महाराष्ट्र, केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टाचे खडे बोल ; विशेष न्यायालय स्थापना प्रस्तावासाठी शेवटची संधी
15
ड्युक्स कंपनीने तपासणीसाठी कसोटी चेंडू परत मागितले; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत चर्चेचा विषय
16
बीसीसीआय मालमाल झाली! ₹ ९,६४१ कोटींची केली रेकॉर्ड ब्रेकिंग कमाई
17
भारतीय महिला संघ लॉर्ड्स वनडे जिंकण्यास सज्ज; इंग्लंडविरुद्ध दुसरा सामना आज
18
मुंबईची सारा जामसुतकर ठरली ‘चॅम्पियन’
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

मुलांना सोडून गुरुजींचा पोबारा

By admin | Updated: January 9, 2015 01:22 IST

एका विद्यार्थ्याच्या नातेवाइकांनी मंगळवारी थेट शाळेवरच हल्ला करीत शिक्षकांना मारहाण केल्याने भीतीपोटी निवासी शिक्षकांनी रात्रीच विद्यार्थ्यांना संस्थेच सोडून पोबारा केला.

कोल्हापूर : एका विद्यार्थ्याच्या नातेवाइकांनी मंगळवारी थेट शाळेवरच हल्ला करीत शिक्षकांना मारहाण केल्याने भीतीपोटी निवासी शिक्षकांनी रात्रीच विद्यार्थ्यांना संस्थेच सोडून पोबारा केला. त्यामुळे शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षकांची वाट पाहत बसावे लागले.सातारा येथील भारतीय भटके, विमुक्त, विकास व संशोधन संस्थेची पाचगाव येथे राजर्षी छत्रपती शाहू माध्यमिक आश्रमशाळा आहे. ३० डिसेंबरला शाळेतील वायर चोरल्याच्या आरोपावरून सूरज पवार याला अधीक्षक जाधव यांनी मारहाण केल्याच्या रागापोटी सूरजने मामाच्या उचगाव येथील घरी स्वत:वर रॉकेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात सूरज गंभीर जखमी झाला. त्यामुळे चिडलेल्या नातेवाइकांनी मंगळवारी थेट शाळेवरच हल्ला चढवीत दिसेल त्या शिक्षकांना मारहाण केली.याची माहिती शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रूपेश पाटील यांना समजताच त्यांनी आश्रमशाळेत धाव घेत रात्री शंभर मुलांना आपल्या घरी नेले आणि बुधवारी सकाळी या मुलांना शाळेत आणून सोडले. मुले शाळेत आल्यानंतर सकाळी नऊ वाजता सुरू होणारी शाळा शिक्षकच नसल्याने दुपारी बारा वाजले तरी सुरू झाली नाही. त्यामुळे पुन्हा पाटील यांनी सातारा येथून अतिरिक्त कर्मचाऱ्यांना बोलावून घेतले.यंदा आमचे दहावीचे वर्ष आहे. जे शाळेत शिकविले जाते, त्याच्याच आधारावर आम्ही शिकत आहोत. त्यामुळे शाळा लवकरात लवकर सुुरू व्हावी.- तृप्ती हेगडे, विद्यार्र्थिनीतू पारधी समाजाचा आहेस. तुझ्याकडून हे शिकणे होणार नाही. तू असाच आहेस, असे वारंवार जाणीवपूर्वक येथील शिक्षक सूरजला बोलत होते. यातच त्याच्यावर वायर चोरल्याचा आरोप ठेवण्यात आला. त्यामुळे सूरजने घरी आल्यानंतर आत्महत्येचा प्रयत्न केला. याला तेथील अधीक्षक व शिक्षक जबाबदार आहेत.- मारुती चव्हाण, सूरज पवारचे मामा संस्थेतील विद्यार्थी सूरज पवार हा रीतसर रजाचिठ्ठी देऊन घरी गेला होता. त्याला अधीक्षक व कोणत्याही शिक्षकाने मारहाण केलेली नाही. त्यामुळे नातेवाइकांचे आरोप निखलास खोटे आहेत. - तानाजी घोरपडे, प्रभारी मुख्याध्यापक, राजर्षी छत्रपती शाहू आश्रमशाळा‘त्या’ विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यूच्धुळे : अमळनेर तालुक्यातील पिंपळे आश्रमशाळेतील कृष्णा सुरेश पावरा (८) या विद्यार्थ्याचा धुळे जिल्हा रूग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी सकाळी मृत्यू झाला़ पिंपळे येथील सुकलाल आनंदा पाटील अनुदानित आश्रमशाळेत कृष्णा पावरा हा दुसरीत शिकत होता़ बुधवारी रात्री त्याने जेवण केले व झोपला. त्यास पहाटे चारच्या सुमारास उलट्यांचा त्रास सुरू झाला़ ही बाब लक्षात येताच त्याला अमळनेर येथे रुग्णालयात दाखल केले़ कृष्णाची प्रकृती अधिक खालावल्याने त्याला गुरूवारी सकाळी धुळे जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले़ उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला़ शवविच्छेदनाचा अहवाल दोन दिवसांत मिळाल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येईल, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ़ अनंत बोर्डे यांनी दिली़