शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

गुरुजी, कधी मिळेल खिचडी? राज्यातील ८८ लाख विद्यार्थी विचारताहेत प्रश्न, तांदूळ संपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2023 10:18 IST

येत्या ८-१० दिवसांत तांदूळ मिळाला नाही तर ९० टक्के शाळांमधील पाेषण आहार बंद हाेण्याची शक्यता आहे.

 मुंबई : राज्यातील जिल्हा परिषद, तसेच अनुदानित शाळांमधील आठवीपर्यंतचे ८८ लाखांहून अधिक विद्यार्थी शालेय पोषण आहारापासून वंचित असल्याचे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. आहार पुरविण्यासाठीची निविदा प्रक्रिया रखडल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. पोषण आहाराचा पुरवठा मागील सुमारे दोन महिन्यांपासून बंद असल्याने शाळांमध्ये खिचडी शिजलेलीच नाही. येत्या ८-१० दिवसांत तांदूळ मिळाला नाही तर ९० टक्के शाळांमधील पाेषण आहार बंद हाेण्याची शक्यता आहे.

राज्यात काय स्थिती?६७,५४९एकूण शाळा८८,६७,३०४एकूण विद्यार्थीमासिक किती तांदूळ येतो? ३०,६५७ मेट्रिक टनकिती शाळांनी मागणी केली? ८,८५६

मराठवाडा१७,५१५एकूण शाळा२३,०३,१७०एकूण विद्यार्थीमासिक किती तांदूळ येतो? ५,६१६ मेट्रिक टनकिती शाळांनी मागणी केली? ४,७२५

कोकण७,५४८एकूण शाळा८,०३,५२९एकूण विद्यार्थीमासिक किती तांदूळ येतो? १,४९० मेट्रिक टनकिती शाळांनी मागणी केली? उपलब्ध नाही

विदर्भ१२,८०७एकूण शाळा१२,९९,१७५एकूण विद्यार्थीमासिक किती तांदूळ येतो? ३,९९९ मेट्रिक टनकिती शाळांनी मागणी केली? १,२२२

प. महाराष्ट्र१८,२९६एकूण शाळा२५,७७,२७८एकूण विद्यार्थीमासिक किती तांदूळ येतो? ७,६०४ मेट्रिक टनकिती शाळांनी मागणी केली? २,७९१

उ. महाराष्ट्र११,३८३एकूण शाळा१८,८४,१५२एकूण विद्यार्थीमासिक किती तांदूळ येतो? ११,९४८ मेट्रिक टनकिती शाळांनी मागणी केली? ११८

या जिल्ह्यांना तांदूळ मिळाला : चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, वाशिम

सध्या कुठे काय स्थिती?सध्या काही शाळा त्यांच्याकडे शिल्लक असलेला तांदूळ व इतर साहित्यातून शालेय पाेषण आहार शिजवून मुलांना देत आहेत.पोषण आहाराचा तांदूळ काही जिल्ह्यांत दर महिन्याला शासकीय गोदामात जमा होतो. तर काही जिल्ह्यांमध्ये त्याचा थेट शाळांना पुरवठा होतो.पुरवठा करण्याचा नवीन करार झालेला नाही. त्यामुळे जुन्या पुरवठादाराकडे करारानुसार मागणी करता येत नाही.अधिकृतरीत्या शाळांचा अहवाल मागविला आहे. तूर्तास अनेक शाळांनी पोषण आहार संपल्याचे तोंडी कळविले आहे.आठवडाभर पुरेल इतका पोषण आहार काही शाळांकडे सध्या शिल्लक आहे. त्यामुळे त्या शाळांनी मागणी नोंदवलेली नाही.

टॅग्स :Schoolशाळा