शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Gunratna Sadavarte, Jayashree Patil: साताऱ्यात सदावर्तेंना, मुंबईत जयश्री पाटलांना दिलासा; न्यायालयाचे पोलिसांना अटक न करण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2022 19:26 IST

Jayashree Patil Arrest Court Order: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी अडचणीत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटलांना आज मोठा दिलासा मिळाला आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केल्या प्रकरणी अडचणीत आलेले वकील गुणरत्न सदावर्ते आणि जयश्री पाटलांना आज मोठा दिलासा मिळाला आहे. सदावर्ते यांना सातारा न्यायालयानेन्यायालयीन कोठडी दिली आहे. तर जयश्री पाटलांना अटकेपासून संरक्षण मिळाले आहे. 

सिल्व्हर ओकवर हल्ला प्रकरणी आणि जयश्री पाटलांना मुंबई सत्र न्यायालयाकडून अटकेपासून अंतरिम दिलासा देण्यात आला आहे. पाटील यांना 29 एप्रिलपर्यंत अटक न करण्याचे निर्देश न्यायालयाने मुंबई पोलिसांना दिले आहेत. 

तर दुसरीकडे गुणरत्न सदावर्ते यांना सातारा न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यानंतर सदावर्ते यांच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या जामिन अर्जावर मंगळवारी सुनावणी घेतली जाणार आहे. आता सदावर्तेंना सारखे सारखे न्यायालयात हजर व्हावे लागणार नाहीय, यामुळे त्यांना उद्या मुंबईच्या आर्थररोड जेलमध्ये हलविण्यात येईल, असे सदावर्तेंचे वकील  श्याम प्रसाद बेगमपूरे यांनी सांगितले. 

सदावर्तेंची दीड वर्षांनी चौकशी...दीड वर्षांपूर्वी खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या गुन्ह्यात अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने अ‍ॅड. सदावर्तेना दि. १८ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. आज पुन्हा पोलिसांनी सदावर्तेंची पोलीस कोठडी मागितली होती. परंतू न्यायालयाने ही मागणी फेटाळली. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारCourtन्यायालयST Strikeएसटी संपPoliceपोलिस