शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ठरलं! आता गुणरत्न सदावर्तेही अयोध्येला जाणार; रामलल्लाचं दर्शन घेणार, साधू-महंतांचे निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 19:37 IST

कष्टकरी जनसंघ हिंदुस्थानला सुजलाम सुफलाम करण्यासाठी अयोध्येला जाणार असून, प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.

मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केल्यानंतर आता महाराष्ट्रातील अन्य नेत्यांनीही अयोध्या दौऱ्याचे आयोजन केले आहे. युवासेना नेते आणि राज्याचे पर्यटन, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांचाही अयोध्या दौरा झाल्याचे सांगितले जात आहे. यात आता विधिज्ञ गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांनीही अयोध्येला जाणार असल्याचे जाहीर केले आहे.  

गुणरत्न सदावर्ते यांची मुंबई पोलिसांनी पुन्हा एकदा चौकशी केली. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. आपण राम जन्मभूमीच्या केसमध्ये वकील होतो, त्यामुळे आपल्याला अयोध्येतून बोलावणे आले आहे, अशी माहिती गुणरत्न सदावर्ते यांनी दिली. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत त्यांच्या पत्नी जयश्री पाटील याही अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. 

अयोध्येत  प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार

जय श्रीराम आणि जय भीम म्हणणारे आता कुणालाही घाबरत नाहीत. बँकेची निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर पायाखालची वाळू घसरली. अयोध्येत आमचे साधू आणि महंत स्वागत करणार आहेत. डंके की चोट पर यापुढे विरोधकांना उत्तर देऊ. आमचे हक्क राज्य सरकार असे पायदळी तुडवू शकत नाही. कष्टकरी जनसंघ हे हिंदुस्थानला सुजलाम सुफलाम करण्यासाठी या महिन्याच्या शेवटी अयोध्येला जाणार असून प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणार असल्याचे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले. 

दरम्यान, मुंबई पोलिसांनी गुणरत्न सदावर्तेंना पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे. त्यामुळे गावदेवी पोलिसांनी त्याची चौकशी केली. ही नोटीस राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा दावा सदावर्तेंच्या वकिलांनी केला. गुणरत्न सदावर्तेंना पाठवलेली नोटीस म्हणजे न्यायालयाचा अवमान असल्याचा दावाही सदावर्ते यांच्या वकिलांनी केला. आता यावर १४ जून पर्यंत उत्तर देणार असल्याचे सदावर्ते यांच्या वकिलांनी स्पष्ट केले आहे. दुसरीकडे, गुणरत्न सदावर्ते यांनी 'एसटी कष्टकरी जनसंघ' या संघटनेची स्थापना केली आहे. या माध्यमातून ते एसटी बँकेची निवडणूक लढवणार आहेत. तसेच यापुढे राज्यातील प्रत्येक निवडणूक आपण लढणार असल्याचे त्यांनी घोषित केले आहे. 

टॅग्स :Gunratna Sadavarteगुणरत्न सदावर्तेAyodhyaअयोध्या