शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

“पाच कोटी मोजायला गेलेले का?” खैरेच्या आरोपावर गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2022 22:10 IST

खैरे यांनीही शिंदे गटातील आमदारांना आणखी पाच पाच कोटी रुपये दिले गेल्याचा सनसनाटी आरोप केला.

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० हून अधिक आमदारांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत दोन गट पडले होते. तसेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकासा आघाडी सरकारही कोसळले होते. दरम्यान, या बंडखोर आमदारांना ५० खोके देण्यात आल्याचा आरोप ठाकरे गटाकडून नेहमी होत असतो. त्यातच आता माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनीही शिंदे गटातील आमदारांना आणखी पाच पाच कोटी रुपये दिले गेल्याचा सनसनाटी आरोप केला. त्यांच्या आरोपांवर गुलाबराव पाटलांना प्रत्युत्तर देत टोला लगावला.

“ज्यावेळी सत्तांतर झालं तेव्हाच सांगितलं होतं की जेव्हा शिवसेना भाजपचं सरकार येईल तेव्हा देवीचं दर्शन घ्यायला जाऊ. या अर्थानं सर्व जण दर्शन घ्यायला गेले होते. कोणी काही बोलत असतील पाच कोटी घेतले तर ते मोजायला गेले होते का माहित नाही?” असं म्हणत गुलाबराव पाटलांनी चंद्रकांत खैरेना टोला लगावला. निश्चितपणे माणूस ज्या देवावर श्रद्धा ठेवतो ती पूर्ण करतो ही आपली पद्धत आहे. त्यामुळे सर्व गेल्याचे पाटील म्हणाले.

काय म्हणाले होते खैरे?“इकडे या गद्दार आमदारांना ५० खोके मिळाले होते. त्यानंतर आता गुवाहाटीमध्ये गेल्यावर प्रत्येकी पाच पाच खोके आणखी मिळाले. एका उद्योगपतीने मला ही खात्रिलायक माहिती दिली आहे,” असे खैरे म्हणाले. हे जर असं असेल. केवळ आमदारांना जपण्यासाठी सरकार असं करत असेल तर ते योग्य नाही. शेतकरी आज उपाशी मरतो, आत्महत्या करयला लागलाय. आम्ही शेतकऱ्यांसाठी येथे उन्हा तान्हात आंदोलन करतोय. तिकडे हे आमदारांची खुशामतखोरी करताहेत. कशाकरता करताहेत, असा सवालही खैरे यांनी केला होता.

टॅग्स :Gulabrao Patilगुलाबराव पाटीलEknath Shindeएकनाथ शिंदेChandrakant Khaireचंद्रकांत खैरे