शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

संघाचा गुरूदक्षिणा निधी बेहिशोबी - दिग्विजय सिंग

By admin | Updated: July 23, 2016 20:27 IST

गुरुदक्षिणा म्हणून दर वर्षी जो निधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून गोळा केला जातो त्याचा कुठेच हिशेब ठेवला जात नसल्याचा आरोप यांनी केला आहे

ऑनलाइन लोकमत -
पणजी, दि. 23 - गुरुदक्षिणा म्हणून दर वर्षी जो निधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून गोळा केला जातो त्याचा कुठेच हिशेब ठेवला जात नसल्याचा आरोप कॉंग्रेसचे राष्ट्रीय सरचीटणीस आणि गोव्याचे प्रभारी दिग्विजय सिंग यांनी केला आहे. 
 
संघाची अधिकृतपणे नोंदणीही झालेली नाही.  संघ आणि संघ परिवाराकडून देशात शांती बिघडविण्याचे काम केले आहे. या संघटनेचाच  हिस्सा असलेली गो रक्षा ही संघटना खंडणी गोळा करणारी संघटना आहे. गुजरातमधील दलितांवरील अत्याचारातून ते उघडही झाले आहे असे त्यांनी सांगितले.
 
काश्मीर मधील हिंसाचार हा दुर्दैवी आहे. मध्यंतरी अटलबिराहारी वाजपेयीच्या राजवटीत काश्मीर घाटीत शांतता प्रस्तापीत करण्यासाठी प्रयत्न केले होते त्यासाठी कॉंग्रेसनेही सहकार्य केले होते. सध्याच्या भाजप सरकारच्या आणि कॉंग्रेसच्या काश्मीर विषयक भुमिकेत मूलभूत फरक आहेत. भाजपला काश्मिरींशिवाय काश्मीर भारतात हवा आहे तर कॉंग्रेसला काश्मीरींसह काश्मीर भारतात हवा आहे असे त्यांनी सांगितले.
 
महायुतीचा प्रस्तावच नाही, कॉंग्रेस ४० जागा लाढविणार
आगामी विधानसभा निवडणुकीत गोव्यात महायुतीचा विषय सातत्याने चर्चिला जात असला तरी तसा कोणताही प्रस्ताव कॉंग्रेसला अद्याप आलेला नाही असे या पक्षाचे प्रभारी दिग्वीजय सिंग यांनी म्हटले आहे.  राज्यातील सर्व ४० जागा कॉंग्रेस लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
भाजपला येत्या निवडणुकीत कॉंग्रेस पराभव चाखायला लावणार आहे. राष्ट्रीय पातळीवर तसेच राज्यातही चांगले प्रशासन देण्यास भाजप सरकार असमर्थ ठरले आहे. त्यासाठी धर्मनिरपेक्ष शक्तींनी एकत्र येणे चांगलेच आहे असे दिग्विजय सिंग यांनी सांगितले. महागठबंधनाच्या प्रस्तावाविषयी विचारले असता तसा प्रस्तावच नसल्याचे ते म्हणाले. गोवा फॉरवर्ड पक्षाने कॉंग्रेसमध्ये विलीन होण्याचेही आवाहन त्यांनी केले. 
 
कॉंग्रेसचे आमदार विश्वजित राणे यांनी महायुती न झाल्यास कॉंग्रेस सोडण्याच्या दिलेल्या धमकी विषयी विचारले असता त्यांच्या वक्तव्याचा माध्यमांनी विपर्यास्त केल्याचे सांगून राणे यांच्याशी आपले बोलणे झाल्याचे ते म्हणाले. ८५ टक्के राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष कॉंग्रेसमध्ये आला असल्यामुळे या पक्षाच्या युती करण्याचा प्रश्नच राहिलेला नाही. ऊर्वरीत १५ टक्के राष्ट्रवादीनेही कॉंग्रेस मध्ये येण्याचे आवाहन त्यांनी केले. 
 
वेस्टन शिपयार्ड प्रकरण संसदेत उपस्थित करणार आणि केंद्रीय भूपृष्टवाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्याशीही या विषयावर चर्चा करणार असल्याचे आश्वासन त्यांनी वेस्टनशिपर्याडच्या कर्मचा-यांना दिले. आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या वेस्टन शिपयार्डचे कामगार आणि क्रीडा खात्याच्या कर्मचाºयांना त्यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांच्या बरोबर प्रदेशाध्यक्ष लुईझीन फालेरो, राष्ट्रीय सचीव चेल्ला कुमार व इतर नेते होते.