शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हल्ल्याचा मास्टरमाईंड हाफीज सईदला पाकिस्तान भारताला सोपवणार?; मुलगा तल्हा सईदचा खुलासा
2
रशियानं बदला घेतला, युक्रेन जबरदस्त हादरला! ४०० हून अधिक ड्रोन अन् ४० बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांचा कहर, झेलेन्स्की संतापले
3
Uddhav Thackeray : "महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल, लवकरच..."; 'मनसे'सोबतच्या युतीवर उद्धव ठाकरेंचं मोठं विधान
4
मस्क-ट्रम्प वादात स्टारलिंकसाठी मोठी बातमी! भारताने लायसन दिले...
5
रशियाच्या बदल्यानं युक्रेन हादरलं! ४०० ड्रोन अन् ४० हून अधिक मिसाईल हल्ल्यानं सगळीकडे विनाश
6
IND vs ENG : पतौडी ट्रॉफी आता तेंडुलकर-अँडरसन नावाने ओळखली जाणार! गावसकर नाराज, कारण...
7
पाण्यासाठी पाकिस्तानकडून विनवण्या, एक-दोन नव्हे चारवेळा पाठवलं पत्र! पण... 
8
तिसऱ्या मुलासाठी प्रसूती रजा नाकारली पण सर्वोच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निर्णय
9
एकीकडे युतीची चर्चा, पण दुसरीकडे मनसेचा बडा नेता मातोश्रीवर; उद्धव ठाकरेंनी बांधले शिवबंधन
10
'मी हा अध्याय संपवत आहे' टीम इंडियाचा आणखी एक खेळाडू तडकाफडकी निवृत्त!
11
Makarand Anaspure : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मकरंद अनासपुरेंनीही केलं होतं भाष्य, म्हणालेले की, "मराठी माणूस..."
12
Narendra Modi : "तो कुटुंबासाठी कष्ट करत होता, दहशतवाद्यांनी त्याला मारलं"; आदिलच्या आठवणीत मोदी भावुक
13
आजीच्याच शाळेत जातोय नातू...! पृथ्वी अंबानीच्या शाळेचे नाव काय, फी किती? डोळेच विस्फारतील...
14
'मला अशा मुली आवडत नाहीत, ज्या...'; भाजप नेत्याचे कपड्यांबद्दल वादग्रस्त विधान
15
Lord Hanuman : हनुमंताला पाच भाऊ होते, तेही विवाहित; काय होती त्यांची नावे? जाणून घ्या!
16
iPhone युजर्ससाठी खूशखबर! ट्रम्प यांच्या धमकीनंतरही Apple नं टाटांना सोपावलं दुरुस्तीचं काम
17
छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा कडेलोट करा: हर्षवर्धन सपकाळ
18
Gold Price Today: सोनं झालं स्वस्त, खरेदीपूर्वी जाणून घ्या काय आहेत नवे दर?
19
पाकिस्तानने हेरगिरीसाठी महिलांचीच निवड का केली? गद्दार तुफैल-हारूनने चौकशीत सांगून टाकलं!
20
आधी आईनं गळा आवळला, त्यानंतर मामानं...; बारावीत शिकणाऱ्या मुलीसोबत घडलं भयंकर!

गुजरातचा गुंगीमॅन अखेर गजाआड

By admin | Updated: November 1, 2015 01:13 IST

गुजरात पोलिसांना गुंगीचे औषध देऊन पळ काढणाऱ्या गुंगीमॅनला तब्बल नऊ महिन्यानंतर अटक करण्यास माटुंगा पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे, पोलिसांसह नागरिकांना गुंगीचे औषध देऊन

- मनीषा म्हात्रे,  मुंबईगुजरात पोलिसांना गुंगीचे औषध देऊन पळ काढणाऱ्या गुंगीमॅनला तब्बल नऊ महिन्यानंतर अटक करण्यास माटुंगा पोलिसांना यश आले. विशेष म्हणजे, पोलिसांसह नागरिकांना गुंगीचे औषध देऊन तो लुटत असे. त्यात गुंगीच्या औषधाचे प्रमाण अधिक झाल्याने दोन ज्येष्ठ नागरिकांचा बळी गेला होता. मूळचा गुजरात येथील रहिवाशी असलेला गुंगीमॅन धनाढ्य व्यावसायिकांना गाठायचा. त्यांना बोलण्यात गुंतवून शीतपेयातून गुंगीचे औषध देत त्यांची लूट करून तो पसार होत असे. बस, टे्रनमधील सहप्रवाशांनाही अशाच प्रकारे बेशुद्ध करून त्यांची फसवणूक करत होता. गुजरातसह महाराष्ट्रातील विविध भागात या गुंगीमॅनने धुमाकूळ घातला होता. याच गुंगीच्या औषधाचे प्रमाण अधिक झाल्यामुळे दोन ज्येष्ठांचा मृत्यू झाला. त्याच्यावर फसवणुकीबरोबर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांच्या हातावर तुरी देत गुंगीमॅन पसार होत असल्याने गुजरात पोलिसांसाठी तो डोकेदुखी ठरला होता. अखेर तो हाती लागला, या आनंदात असलेले गुजरात पोलीस त्याला न्यायालयात नेत असताना गुंनीमॅनने पोलिसांनाच गुंंगीचे औषध देऊन पळ काढण्याचे ठरविले. न्यायालयात नेत असताना पत्नीच्या मदतीने त्याने शीतपेयामधून पोलिसांना गुंगीचे औषध देऊन न्यायालयातून पळ काढला. गुजरात पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके त्याच्या शोधासाठी गुजरातसह महाराष्ट्रातत रवाना झाली होती. तब्बल नऊ महिने पोलिसांना गुंगारा देत गुंगीमॅन पळ काढत होता. हा गुंगीमॅन माटुंगा येथे येणार असल्याची माहिती उपनिरीक्षक देवाडीकर यांच्या पथकाला मिळाली. त्यानुसार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी.एम. काकड यांच्या मार्गदर्शनाखाली देवाडीकर यांच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळल्या. गुंगीसाठी झोपेच्या गोळ्यांचा वापरऔषधांच्या दुकानात सहज उपलब्ध होणाऱ्या वेगवेगळ्या गुंगीच्या औषधांसह झोपेच्या गोळयांचा वापर गुंगीसाठी वापर करत होता. याच गुंगीच्या औषधाद्वारे तो नागरिकांची फसवणूक करत होता. यात आणखी किती जणांचा सहभाग आहे? तो असे का करत होता? याबाबत अधिक तपास सुरू आहे.