98 लाखांचं गोल्डन शर्ट घालणा-याची गिनीज बुकात नोंद

By admin | Published: May 3, 2016 08:49 PM2016-05-03T20:49:15+5:302016-05-04T09:31:18+5:30

महाराष्ट्रातले नामचीन उद्योगपती आणि राजकारणी पंकज पारख यांनी गोल्डन शर्ट घातलं आहे. त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली

The Guinness Book of 98 million gold shirt lay-off | 98 लाखांचं गोल्डन शर्ट घालणा-याची गिनीज बुकात नोंद

98 लाखांचं गोल्डन शर्ट घालणा-याची गिनीज बुकात नोंद

Next

 ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. 3- महाराष्ट्रातले नामचीन उद्योगपती आणि राजकारणी पंकज पारख यांनी 98 लाखांचं गोल्डन शर्ट घातल्यानं त्यांची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे.उद्योगपती पारख यांना आज गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डतर्फे प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. जगात या शर्टची किंमत 98 लाख 35 हजार 99 रुपये इतकी आहे.
हे अविश्वसनीय आहे, मी महाराष्ट्रातल्या एका भागातला छोटा माणूस आहे. या कार्यामुळे आमच्या छोट्याशा गावाचं नाव जगभरात झालं, यासाठी मी समाधानी आहे, अशी भावना पंकज पारख यांनी व्यक्त केली आहे.
लहानपणी शाळा सोडल्यानंतर त्यांनी गारमेंटचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली. पुढे गारमेंटच्या व्यवसायात ते यशस्वी उद्योगपती म्हणून नावारूपाला आले. त्यानंतर सक्रिय राजकारणात त्यांनी प्रवेश केला. राष्ट्रवादी पक्षातर्फे नगरसेवक आणि नंतर उपमहापौर होण्याचा त्यांनी मान मिळवला. आता पंकज पारख या गोल्डन शर्टमुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पंकज पारख यांच्या गोल्डन शर्टाचं वजन जवळपास 4.10 किलो आहे. या गोल्डन शर्टाची किंमत अंदाजे 1 कोटी 30 लाख आहे. हे शर्ट नाशकातल्या बाफना ज्वेलर्सनं बनवलं आहे. या गोल्डन शर्ट पॉलिश करण्यासाठी मुंबईला पाठवलं होतं. या गोल्डन शर्टमध्ये 18-22 कॅरेटचं सोनं वापरण्यात आल्याची माहिती मिळते आहे. 

Web Title: The Guinness Book of 98 million gold shirt lay-off

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.