शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

एसटी महामंडळाचा जावईशोध, माहिती अधिकाराला लावला जीएसटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2017 00:00 IST

वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर त्याची संपूर्ण देशभर चर्चा झाली. परंतु कोणतीही वस्तू अथवा सेवा दिली जात नसतानाही राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नवा जावईशोध लावला आहे. 

पुणे : वस्तू व सेवा कर लागू झाल्यानंतर त्याची संपूर्ण देशभर चर्चा झाली. परंतु कोणतीही वस्तू अथवा सेवा दिली जात नसतानाही राज्य मार्ग परिवहन महामंडळाने नवा जावईशोध लावला आहे. त्यांनी चक्क माहिती अधिकार कायद्याखाली मागितलेल्या माहितीलाच जीएसटी आणि सीजीएसटी लागू करून माहिती हवी असल्यास तो भरा, असे चक्क पत्रच माहिती मागणा-या कार्यकर्त्याला पाठविले आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते संजय शिरोडकर यांनी एसटी महामंडळाकडे माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज करून माहिती मागितली होती. त्यातील काही मुद्द्यांची माहिती नियोजन व पणन खात्याशी संबंधित तर काही विभागीय पातळीवर अर्ज करून प्राप्त करून घ्यावी असे उत्तर देण्यात आले. याचबरोबर त्यांनी शासकीय लेखा परीक्षण अहवाल मागितला होता. याबाबत त्यांना सहायक मुख्य लेखा अधिकारी सु. गो. खासनीस यांनी हा अहवाल उपलब्ध असल्याचे सांगून तो प्राप्त करून घेण्यासाठी प्रति पृष्ठ २ रुपये प्रमाणे ६ पृष्ठाचे १२ रुपये व ९ टक्के एसजीएसटी १ रुपया आणि ९ टक्के सीजीएसटी १ रुपये असे एकूण १४ रुपये राज्य मार्ग परिवहन महामंडळात जमा करावा व त्याची पावती या कार्यालयात सादर करावी, असे पत्रात म्हटले आहे.याबाबत संजय शिरोडकर यांनी सांगितले की, आपण गेल्या १२ वर्षात ५ हजार माहिती अधिकार कायद्याखाली अर्ज केले आहेत. परंतु अजूनपर्यंत कोणीही माहिती अधिकार कायद्याखाली मागविलेल्या माहितीला जीएसटी लावला नव्हता. महामंडळाने हा जावईशोध कसा लावला हा प्रश्नच आहे. जर जीएसटीमध्ये माहिती अधिकाराचा समावेश असेल तर त्याची प्रत महामंडळाने द्यावी. माहिती अधिकार कायद्यात बदल केला असेल तर त्याची प्रत द्यावी, अशी मागणी त्यांनी महामंडळाकडे केली आहे.

टॅग्स :ST Strikeएसटी संपGSTजीएसटी