शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
3
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
4
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
5
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
6
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
7
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
8
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
9
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
10
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
11
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
12
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
13
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
14
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
15
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
16
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
17
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
18
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
19
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
20
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल

जीएसटीचे २९ हजार कोटी रू. येणे बाकी; राज्यपालांनी मांडली राज्याची आर्थिक स्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 06:37 IST

सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांप्रती आपल्या सर्वांनाच बांधीलकी असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे, असे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्र सरकारकडून जीएसटीची २९ हजार २९० कोटी रुपयांची रक्कम महाराष्ट्राला अद्याप येणे बाकी असल्याचे सांगतानाच राज्याचे महसुली उत्पन्न कोरोनामुळे ३५ टक्क्यांनी घटले असल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सोमवारी सांगितले. विधिमंडळ अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. विशेष म्हणजे, राज्यपालांनी मराठीतून भाषण केले. 

राज्यपाल म्हणाले की,  फेब्रुवारी २०२१ अखेर वस्तू व सेवा कराची नुकसानभरपाई म्हणून राज्य शासनास देय असलेल्या ४६ हजार ९५० कोटी रुपयांपैकी केवळ ६ हजार १४० कोटी रुपये आणि वस्तू व सेवा कराच्या (जीएसटी) नुकसानभरपाईसाठी कर्ज म्हणून ११ हजार ५२० कोटी रुपये केंद्र सरकारने दिले आहेत. 

अपेक्षित महसुली उत्पन्नnराज्यात ३ लाख ४७ हजार कोटी रुपयांचे महसुली उत्पन्न अपेक्षित असताना जानेवारीअखेर केवळ १ लाख ८८ हजार ५४२ कोटी रुपये महसूल जमा झाला आहे. nअंदाजापेक्षा तो ३५ टक्क्यांनी कमी आहे, असे राज्यपाल म्हणाले. असे असूनही राज्य शासनाने कोरोना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना केल्या, अशी प्रशंसा त्यांनी केली. 

श्रद्धांजली अर्पणमाजी मंत्री विलासराव पाटील- उंडाळकर, माजी सदस्य सूर्यकांत महाडिक, आबाजी पाटील, संपतराव जेधे, रणजित भानू, निळकंटराव शिंदे, दौलतराव पवार, हरिभाऊ महाजन यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

एक लाख कोटींची गुंतवणूककोरोनामुळे औद्योगिक  मंदी असूनही महाराष्ट्राने एक लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची देशांतर्गत व विदेशी थेट गुंतवणूक आकर्षित केली आहे. गावे, रस्ते, वाड्यांना महापुरुषांची नावे देण्याचा चांगला निर्णय सरकारने घेतला.

सीमावर्ती भागातील मराठी भाषिकांप्रती आपल्या सर्वांनाच बांधीलकी असून, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी राज्य शासन वचनबद्ध आहे.कापसाची विक्रमी खरेदी सरकारने केली. नैसर्गिक आपत्तीबाधितांना मोठी मदत दिली हे सांगताना राज्यपालांनी त्याची आकडेवारी दिली.

आता भाषणे नाहीतnविधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये यापुढे दिवंगत आजीमाजी सदस्यांना श्रद्धांजली वाहणारी भाषणे होणार नाहीत. याबाबत संसदेचा पॅटर्न स्वीकारण्यात आला आहे. nदोन्ही सभागृहांमध्ये दिवंगत आजीमाजी सदस्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकप्रस्ताव येतो आणि त्यावर सदस्यांची भाषणे होतात. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीvidhan sabhaविधानसभा