शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 08:32 IST

Eknath Shinde On GST: देशात आजपासून नवे जीएसटी दर लागू झाले असून आता फक्त पाच टक्के आणि १८ टक्के असे दोनच जीएसटी स्लॅब राहतील.

देशात आजपासून नवे जीएसटी दर लागू झाले असून आता फक्त पाच टक्के आणि १८ टक्के असे दोनच जीएसटी स्लॅब राहतील. त्यामुळे स्वयंपाकघरातील वस्तूंपासून इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत, औषधे, उपकरणांपासून ऑटोमोबाइलपर्यंतच्या क्षेत्रात समाविष्ट ३७५ वस्तूंचे दर कमी झाले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जीएसटीमध्ये करण्यात आलेल्या सुधारणांचे स्वागत करत, त्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'मास्टरस्ट्रोक' आणि 'दिवाळी भेट' असे म्हटले आहे.

जीएसटी परिषदेने २२ सप्टेंबरपासून १२ टक्के आणि २८ टक्के जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे घरांमध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू, इलेक्ट्रॉनिक्स, औषधे आणि ऑटोमोबाईलसह एकूण ३७५ वस्तूंवरील जीएसटीचे दर कमी होणार आहेत. शिंदे यांनी सांगितले की, या निर्णयामुळे सामान्य नागरिक, मध्यमवर्गीय आणि लहान दुकानदारांना मोठा फायदा होईल. तसेच, यातून बांधकाम क्षेत्र, उत्पादन आणि रोजगार वाढेल. या निर्णयामुळे 'लाडक्या बहिणी' अजून जास्त आनंदी होतील, असेही शिंदे म्हणाले. त्यांनी हा निर्णय देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी चालना देईल असा विश्वास व्यक्त केला.

जीएसटी परिषदेने जीएसटी स्लॅब १२ टक्के आणि २८ टक्क्यांवरून कमी करून आता ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच स्लॅब ठेवण्यात आले आहेत. सिगारेट, तंबाखू आणि दारू यांसारख्या वस्तूंवर ४० टक्के जीएसटी लागू केला जाईल.

एकनाथ शिंदेंचे 'एक्स' अकाउंट हॅकएकनाथ शिंदे यांचे एक्स अकाऊंट रविवारी सकाळी हॅक झाले. हॅकर्सनी त्यांच्या अकाऊंटवर पाकिस्तान व तुर्कियेचे झेंडे असलेली पोस्ट शेअर केली. एक व्हिडीओही पोस्ट केला होता. मात्र, काही मिनिटांतच या पोस्ट डिलीट करून अकाऊंट सुरक्षित करण्यात आले. पाकिस्तानशी संबंधित पोस्ट थेट उपमुख्यमंत्र्यांच्या अकाऊंटवर शेअर झाल्यामुळे हा सायबर हल्ला असल्याचे मानले जात आहे. विरोधकांनी याप्रकरणी सामान्यांच्या ऑनलाईन सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्रPoliticsराजकारणGSTजीएसटी