शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीतील जाचकपणा काँग्रेसमुळेच: पियूष गोयल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 20:49 IST

बैठकीत एक व बाहेर दुसरी अशा काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेमुळेच लहान व्यापाऱ्यांना आम्हाला द्यायचा असलेला लाभ मिळू शकला नाही..

ठळक मुद्देव्यापाऱ्यांनी वाचला तक्रारींचा पाढा कर व्यवस्थेत असणारा भ्रष्टाचार बंद करण्यासाठी म्हणून जीएसटी, ऑनलाईन कर

पुणे: लहान व्यापाऱ्यांना जीएसटीतून वगळण्याची मर्यादा भाजपाने ७५ लाखांची केली होती, मात्र सर्वपक्षीय बैठकीत काँग्रेसने त्याला विरोध केला व ती मर्यादा ४० लाख झाली. बैठकीत एक व बाहेर दुसरी अशा काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेमुळेच लहान व्यापाऱ्यांना आम्हाला द्यायचा असलेला लाभ मिळू शकला नाही असा थेट आरोप केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयल यांनी काँग्रेसवर गुरूवारी (दि. १८) पुण्यात बोलताना केला.  भाजपा शिवसेना महायुतीचे पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवार गिरीश बापट यांच्यासाठी आयोजित शहरातील व्यापाºयांच्या मेळाव्यात गोयल यांनी भाजपाची भूमिका मांडली. उमेदवार बापट, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार माधूरी मिसाळ, पालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले तसेच स्थानिक नगरसेवक प्रविण चोरबेले, बाळा ओसवाल, कविता वैरागे व दीपक मिसाळ, अजय भोसले, शर्मिला ओसवाल आदी यावेळी उपस्थित होते. गोयल म्हणाले आम्ही व्यापाऱ्यांकडे चोर म्हणून पहात नाही. व्यापाऱ्यांच्या ज्या समस्या आहेत, त्या या ५ वर्षातील नाहीत, तर त्यापुर्वीच्या आहेत. कर व्यवस्थेत असणारा भ्रष्टाचार बंद करण्यासाठी म्हणून जीएसटी, ऑनलाईन कर अशा नव्या गोष्टी भाजपा करत आहे व त्याचा चांगला फायदा होत आहे. याआधी काहीही केले तरी चालेल अशी वृत्ती होती, ती नियमात राहूनच सगळे केले पाहिजे अशी आम्ही बदलत आहोत. मुक्त व पारदर्शक धोरण अंमलात आणले जात आहे.काँग्रेस व राष्ट्रवादीला फक्त घोषणा करायच्या आहेत, गेली अनेक वर्षे काँग्रेस गरीबी हटाव च्या घोषणा करत आहेत, त्यांची गरीबी हटली व गरीबांची मात्र वाढली असे गोयल म्हणाले. बापट व अन्य वक्त्यांचीही यावेळी भाषणे झाली. बहुसंख्य व्यापाऱ्यांनी जीएसटी ची पद्धत जाचक असल्याच्या तक्रारी केल्या. यात गरज व आवश्यकता लक्षात घेऊन हळूहळू बदल होत जातील असे गोयल यांनी त्यांना सांगितले. 

टॅग्स :Puneपुणेpiyush goyalपीयुष गोयलcongressकाँग्रेसGSTजीएसटी