शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

खुल्या प्रवर्गासाठी बढत्या पुन्हा सुरू होणार

By यदू जोशी | Updated: December 6, 2017 05:44 IST

मागासवर्गीयांसाठी बढत्यांमधील आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचा फटका खुल्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचा-यांना बसल्याने निर्माण झालेल्या असंतोषाची दखल घेत आता

मुंबई : मागासवर्गीयांसाठी बढत्यांमधील आरक्षणाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याचा फटका खुल्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचा-यांना बसल्याने निर्माण झालेल्या असंतोषाची दखल घेत आता खुल्या प्रवर्गातील पदोन्नती सुरू करण्याची भूमिका सामान्य प्रशासन विभागाने घेतली आहे. त्या बाबत विभागाने विधी व न्याय विभागाचा सल्ला मागितला असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे.सर्वच प्रवर्गांच्या अधिकारी, कर्मचा-यांच्या बढत्या ३ नोव्हेंबरच्या आदेशाने शासनाने रोखून धरल्या आहेत. एससी, एसटी, एसबीसी आणि व्हीजेएनटी या मागास प्रवर्गांना बढत्यांमधील आरक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याच्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासन विभागाने हा निर्णय घेतला होता. त्यामुळे मागासवर्गीयांबरोबरच त्याचा फटका खुल्या प्रवर्गालादेखील बसला. काही अधिकाºयांना निवृत्तीच्या तोंडावर बढतीची आशा होती पण सरकारच्या निर्णयामुळे ते बढतीपासून वंचित राहिले.राज्य सरकारने २००४ मध्ये मागासवर्गीयांना बढत्यांमध्ये दिलेले आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने या वर्षी ४ आॅगस्टला रद्द ठरविले होते. त्या निर्णयाला राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने कोणतीही स्थगिती दिली नाही. आता येत्या ४ जानेवारीला सुनावणी होणार आहे.३ नोव्हेंबरपासून राज्यभरातील सुमारे एक हजार बढत्या रखडल्याअसून त्यातील ७०० या खुल्या प्रवर्गातील असून दरदिवशी हा आकडा वाढत आहे.सध्या १०० टक्के बढत्या बंद आहेत. त्याऐवजी खुल्या प्रवर्गातील बढत्या (६७ टक्के) सुरू कराव्यात आणि मागास प्रवर्गातील बढत्या (३३ टक्के) सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर द्याव्यात, असेसामान्य प्रशासन विभागाने प्रस्तावित केले असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.सामान्य प्रशासन विभागाने विधि व न्याय विभागाला सल्ला मागितल्यानंतर आता या विभागाने राज्याच्या महाधिवक्त्यांकडे सल्ला मागितला असल्याचे सूत्रांनी सांगितले.