शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये कला, क्रीडेच्या तासिकांमध्ये वाढ, निर्णयाचे स्वागत : वेळापत्रकात बदल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2017 02:45 IST

शाळेतील कला आणि क्रीडा विषयाच्या तासिका ४ वरून २ करण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत कलेला, खेळायला वाव मिळणार नाही.

मुंबई : शाळेतील कला आणि क्रीडा विषयाच्या तासिका ४ वरून २ करण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत कलेला, खेळायला वाव मिळणार नाही. विद्यार्थ्यांची वाढ खुंटेल असे शिक्षकांचे म्हणणे होते. त्यामुळे याला शिक्षकांनी विरोध केला होता. अखेर शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खेळायला आणि कलेसाठी अशा मिळून दोन तासिका वाढवून दिल्याने शिक्षकांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाच्या नवीन निर्णयानुसार, शाळांच्या केलेल्या वेळापत्रकात आता कलेसाठी ३ आणि क्रीडा विषयासाठी ३ तासिका ठेवण्याचे जाहीर केले आहे.नवीन निर्णयानुसार, इयत्ता १ली ते १०वीसाठी एका आठवड्यातील अध्ययन कालावधी हा ४५ तासिकांवरून ४८ तासिका करण्यात आला आहे. एका वर्गाचा आठवड्याचा एकूण वेळ पूर्वी २६.४५ मिनिटे इतका होता. आता हा वेळ २७.१० मिनिटे इतका होणार आहे. शुक्रवारी ८ तासिकांऐवजी आता ९ तासिका होणार आहेत. पहिली तासिका ही ३५ मिनिटांची आणि पुढील सर्व तासिका या ३० मिनिटांच्या असणार आहेत. शनिवारी ५ऐवजी ७ तासिका घेण्यात येणार आहेत. शुक्रवार आणि शनिवारच्या तासिका या कला आणि आरोग्य व शारीरिक शिक्षण या विषयांसाठी देण्यात याव्यात, असेही स्पष्ट केले आहे.शाळेमध्ये याआधी कला आणि क्रीडा विषयालाही तितकेच महत्त्व दिले जात होते. त्यामुळे प्रत्येकी ४ तासिका होत्या. पण, मध्ये प्राधिकरणाने घेतलेल्या निर्णयानुसार, या तासिका फक्त २ तासिका ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना फक्त वर्गात शिकवावे लागत होते. त्यामुळे आमची मागणी होती की, परत ४ तासिका कराव्यात. पण, आता प्राधिकरणाने ३ केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. शिक्षकांनी याचे स्वागत केले आहे, असे मत मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष प्रशांत रेडीज यांनी व्यक्त केले.

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी