शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी भारताशी पंगा अन् आता पाकिस्तानचा उल्लेख करत 'या' देशानं केलं डोनाल्ड ट्रम्प यांचं कौतुक
2
अमेरिकेची चाल ओळखली, ट्रम्प यांच्या निर्णयाला १० देशांचा विरोध; पहिल्यांदाच भारत-पाकिस्तान एकत्र
3
पुणे हादरलं! 'माझ्या आईला का मारलं?', घरात घुसून धारदार शस्त्राने हल्ला
4
आरबीआयनं महाराष्ट्रातील या सहकारी बँकेचा परवाना केला रद्द, ग्राहकांना आपल्याच खात्यातून पैसे काढता येणार नाही
5
९ पानी चिठ्ठी, अनेक बड्या अधिकाऱ्यांची नावे...; IPS पूरन कुमार मृत्यू प्रकरणात मोठा खुलासा
6
Video: १२० ग्रॅम सोने, १८ लाख देऊन युवकानं केलं घटस्फोटाचं सेलिब्रेशन; दुधानं केली आंघोळ, मग...
7
थरार! जयपूर-अजमेर हायवेवर गॅस टँकरचा स्फोट; परिसरात हाहाकार, २० गाड्या आगीत भस्म
8
पूरग्रस्तांसाठी ३१,६२८ कोटींचे महापॅकेज; शेतकऱ्यांना दिलासा : दोनऐवजी तीन हेक्टरसाठी मदतीची घाेषणा
9
संपादकीय: सनातन की संविधान? ही घटना किरकोळ ठरवून चालणार नाही...
10
आजचे राशीभविष्य- ८ ऑक्टोबर २०२५: सुंदर ठिकाणी फिरण्याचा योग, नोकरीत मिळेल बढती!
11
एक सेलेब्रिटी म्हणून त्या कंपनीसोबत जोडले गेले, मानधन मला मिळाले; ६० कोटींच्या घोटाळ्यावर शिल्पा शेट्टी काय म्हणाली...
12
छोट्या प्लाॅटधारकांची चिंता मिटली; मिळेल मालकी, तुकडेबंदी विनाशुल्क
13
हैदराबाद गॅझेट ‘जीआर’ला स्थगिती नाही; सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे हायकोर्टाचे निर्देश
14
नफ्यासाठी फिक्स होतो भारत विरुद्ध पाकिस्तान लढतींचा ड्रॉ! माइक आथर्टनचा ‘आयसीसी’वर आरोप
15
बिहारमध्ये पैशांचा पाऊस ठरणार का गेमचेंजर? महाराष्ट्रासारखेच निवडणुकीच्या तोंडावर सरकारी 'पॅकेज'
16
न्यायाधीशांच्या तोंडी शेऱ्यांचा सोशल मीडियात विपर्यास केला जात आहे; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली चिंता
17
टाटा सन्सच्या संचालक मंडळावरील नियुक्त्यांवरून उफाळले तीव्र मतभेद; केंद्र सरकार हस्तक्षेप करण्याची शक्यता
18
माझे अनेक डीपफेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली माहिती
19
सराव सामन्यात पृथ्वी शॉ मुंबईविरुद्ध तळपला, तंबूत जाता जाता भडकला...

माणुसकीची भिंत ठरतेय गोरगरिबांसाठी आधारवड

By admin | Updated: October 21, 2016 08:54 IST

नागपूरमधील राजेश दुरुगकर नावाच्या व्यक्तीने सुरू केलेली ‘माणुसकीची भिंत’ या गोरगरिबांसाठी खरोखरच एक आधारवड ठरत आहे.

थंडीत कुडकुडणाऱ्यांसाठी कपड्यांची मदत

दयानंद पाईकराव , ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. २१ -  समाजात एक वर्ग असा आहे की त्याच्याजवळ अमाप संपत्ती, ऐषोआरामाच्या वस्तू मुबलक आहेत. परंतु नाण्याची दुसरी बाजू म्हणजे दोन वेळचे जेवण अन् अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडेही नसलेले गरीब लोक. समाजातील हे भीषण वास्तव पाहून राजेश दुरुगकर नावाच्या व्यक्तीने सुरू केलेली ‘माणुसकीची भिंत’ या गोरगरिबांसाठी खरोखरच एक आधारवड ठरत आहे.राजेश दुरुगकर हे भारत पेट्रोलियममधून अधिकारी पदावरून निवृत्त झालेले व्यक्ती. त्यांनीच समाजातील भीषण दारिद्र्य पाहून माणुसकीची भिंत हा उपक्रम अ‍ॅक्शन ग्रुपच्या माध्यमातून शंकरनगर चौकात सुरू केला. शंकरनगर चौकातील भिंतीवर त्यांनी ४० खिळे ठोकले आहेत. यात वापरलेले कपडे दात्यांनी आणून या खिळ्यावर अडकवून निघून जावे अन् ज्यांना खरोखरच घालण्यासाठी कपडे नाहीत, अशा गरीब, गरजूंनी हे कपडे काढून ते वापरावेत अशी या उपक्रमामागील संकल्पना आहे. पहिल्याच दिवशी या उपक्रमाला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत जवळपास ५०० कपडे या माणुसकीच्या भिंतीवर आणून लावले. यात जुने चप्पल, जोडे, चादर, पुस्तके, अंगात घालावयाचे कपडे यांचा समावेश आहे. थंडीच्या दिवसात अनेकांना या उपक्रमामुळे अंगावर घेण्यासाठी चादर आणि कपड्यांची मोलाची मदत झाली आहे. नागपुरातील सर्व भागातील गरिबांना कपडे मिळावेत यासाठी हा उपक्रम लवकरच बजाजनगर, सदर, सीताबर्डी, लॉ कॉलेज चौक येथे सुरू करणार असल्याचे राजेश दुरुगकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. माणुसकीची भिंत या उपक्रमाव्यतिरिक्त गोरगरीब मुलांना शिक्षणासाठी मदत, गरजूंना औषधी वितरण, आजारी असलेल्या मोकाट जनावरांची काळजी घेणे हे कार्यही ते मागील सात वर्षांपासून करीत आहेत. नागपूरव्यतिरिक्त मुंबईत नेरुळ आणि वाशीलाही त्यांनी हा उपक्रम सुरू केला असून या उपक्रमाला समाजातील दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

अमेरिकेत गेल्यानंतर सुचली कल्पनाराजेश दुरुगकर हे अमेरिकेत गेले होते. तेथे त्यांना एका भिंतीवर कपडे अडकविलेले आढळले. उत्सुकतेपोटी त्यांनी हे कपडे कशासाठी लटकविले आहेत याची विचारणा केली. त्यावर त्यांना हे कपडे गोरगरीब नागरिकांसाठी ठेवण्यात आल्याची माहिती मिळाली. भारतातील दारिद्र्य आणि गरजूंसाठी हा उपक्रम राबविण्याचा विचार त्यांच्या मनात आला आणि लगेचच त्यांनी आपल्या मनातील विचार कृतीत उतरवून माणुसकीची भिंती उभी केली.