शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
2
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
3
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
4
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
5
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
6
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
7
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
8
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
9
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
10
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
11
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?
12
'आता तुझ्यासोबत राहायचं नाही'; पतीपासून वेगळं राहणाऱ्या 28 वर्षीय महिलेवर अनेकवेळा बलात्कार
13
मनोज जरांगेंच्या बैठकीत मधमाशांचा हल्ला, सहकाऱ्यांनी अंगावर उपरणी टाकून पाटलांना वाचवलं
14
"माझ्याशी लग्न कर, तुला सगळ्या सिनेमात घेईन...", प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने अभिनेत्याला दिलेली ऑफर, नकार देताच करिअर संपवलं
15
हैदराबाद विद्यापीठाच्या निवडणुकीत ABVP चा मोठा विजय; NSUI ला नोटापेक्षा कमी मते...
16
VIRAL : फक्त तिकीटच नाही, तरुणीचे इन्स्टाग्राम अकाऊंटही तपासले! रेल्वेतील टीटीईचा धक्कादायक प्रताप
17
टॅरिफ, H1B व्हिसानंतर अमेरिकेचा आता भारतीय कोळंबीवर डोळा! मच्छीमारांवर संकट येणार?
18
पती, पत्नी आणि तो... वेगळचं प्रकरण! माहेर अन् सासरच्यांनी मिळून केलं विवाहितेचं अपहरण; पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
19
५००० परदेशी लोकांना नोकरीवर बसवले, १६ हजार अमेरिकींना काढले...; ट्रम्प प्रशासनाने H-1B चा पाढाच वाचला...
20
लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या गर्लफ्रेंडची हत्या; सुटकेसमध्ये भरून मृतदेह १०० किमी दूर नदीत फेकला

महाराष्ट्र गुजरात सीमेवर घोर नृत्योत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2016 03:30 IST

महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्याच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये दिवाळीनिमित्त घोर या नृत्योत्सवास प्रारंभ झाला

अनिरुद्ध पाटील,

डहाणू/बोर्डी- महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पालघर जिल्ह्याच्या डहाणू आणि तलासरी तालुक्यांमध्ये दिवाळीनिमित्त घोर या नृत्योत्सवास प्रारंभ झाला आहे. धनत्रयोदशीच्या दिवशी या नृत्याला सुरु वात होऊन बलिप्रतिपदेला सांगता होते. येथील स्थानिक गुजराती भाषिक समाजात घोर नृत्योत्सवाला मानाचे स्थान असून हा आविष्कार पाहण्यासाठी दरवर्षी पर्यटक दाखल होतात. घोर हे पारंपरिक वाद्य आहे. लोखंडी सळईच्या रिंगणात घुंगरू घातलेले वाद्य हाताच्या मुठीत घेऊन वाजविले जाते.हा पुरुषप्रधान नाचप्रकार असून जोडीदाराच्या साह्याने घोरीच्या तालावर दोन ते तीन प्रकारे फेर धरून नाच केला जातो. एका समूहात बारा ते पंधरा जोड्या असतात. डोक्यावर फेटा, अंगात बनीयन घातल्यानंतर छातीवर नक्षीदार विणकाम करून त्यावर झेंडूच्या माळांनी पुरु षाला सजवलं जातं. कमरेला घुंगरू आणि पांढर्या धोतरामुळे व्यक्तिमत्व रुबाबदार दिसते. तर डोळ्यात काजळ घातल्याने सौंदर्यात भर पडते. एका हातात दांडिया आणि दुसऱ्या हातात मोरपंखाचा गुच्छा असतो, त्यांना घोरया म्हणतात. बगळी( 8 ते 10 फुट उंच बांबूच्या टोकावर कापडाने बनवलेली बगळ्यांची जोडी) मध्यभागी धरली जाते. कवया (गायक) पारंपरिक गाण्याच्या तालावर दोन ते तीन प्रकारे नाच केला जातो. कवया गाणे गाताना गणपती, राम-कृष्ण आणि ग्रामदैवतांची स्तुतीपर कवने गातो. पारतंत्र्यकाळात इंग्रजांविरूद्ध स्वकीयांना जागृत करण्यासाठी तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतिह प्रेरणा देण्यासाठी गायली जात होती. घोर नृत्योत्सवाचा माध्यमातून कवया शाहिरांनी भूमिका बजावत असल्याची माहिती घोलवड येथील जयप्रकाश बारी या कवयाने लोकमतला दिली.>घोर हे पारंपरिक वाद्य धनत्रयोदशीच्या दिवशी मंडली मातेच्या (सरस्वती देवीच्या) विधिवत पूजेने घोर नृत्योत्सवाला प्रारंभ झाला आहे. नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि बलिप्रतिपदेला रात्री घोर नृत्योत्सवाची सांगता होते. समजबांधवाच्या अंगणात, मंदिर आणि ग्रामदैवतांच्या ठिकाणी नृत्य केला जातो. हा नृत्यप्रकार पाहण्यासाठी पर्यटक अभ्यासकांची गर्दी जमते. चिखले गावतील बाबुराव जोंधळेकर, तुकाराम मोठे, प्रदीप मोठे हे कवये पंचक्र ोशीत प्रसिद्ध आहेत.